श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये भारताला विजयासाठी हव्या एवढ्या रन्स

श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये भारताला विजयासाठी भारताला १५३ रन्सची आवश्यकता आहे.

Updated: Mar 12, 2018, 10:10 PM IST
श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये भारताला विजयासाठी हव्या एवढ्या रन्स  title=

कोलंबो : श्रीलंकेविरुद्धच्या टी-20मध्ये भारताला विजयासाठी भारताला १५३ रन्सची आवश्यकता आहे. टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतल्यानंतर भारतानं श्रीलंकेला २० ओव्हरमध्ये १५२/९ वर रोखलं. भारताकडून शार्दुल ठाकूरनं सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. तर वॉशिंग्टन सुंदरला २ विकेट मिळाल्या. जयदेव उनाडकट, युझवेंद्र चहल आणि विजय शंकरला प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आलं.

श्रीलंकेकडून कुसल मेंडिसनं ३८ बॉल्समध्ये सर्वाधिक ५५ रन्स केल्या. तर उपुल थरंगाला २२ रन्स करण्यात यश आलं. श्रीलंकेविरुद्धची पहिली टी-20 भारतानं गमावली होती. यानंतर बांग्लादेशविरुद्ध झालेल्या टी-20मध्ये भारताचा विजय झाला. श्रीलंका आणि बांग्लादेशमधल्या मॅचमध्ये बांग्लादेशला यश मिळालं होतं.