कार्डिफ : इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२०मध्ये शानदार विजय मिळवल्यानंतर आता कोहली सेना सीरिज खिशात टाकण्यासाठी मैदानात उतरेल. ३ मॅचच्या या सीरिजमधली दुसरी टी-२० मॅच शुक्रवारी रात्री १० वाजता (भारतीय वेळेनुसार) या मॅचला सुरुवात होणार आहे. कार्डिफमध्ये ही मॅच होणार आहे. भारतीय टीममध्ये या मॅचमध्ये कोणतेही बदल होण्याची शक्यता नाही. तर इंग्लंडच्या टीममध्ये मात्र पहिल्या दारुण पराभवामुळे बदल होऊ शकतात.
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मध्ये भारताचा शानदार विजय झाला आहे. कुलदीप यादवनं घेतलेल्या ५ विकेट आणि लोकेश राहुलच्या शतकामुळे भारतानं ही मॅच ८ विकेटनं जिंकली. ३ मॅचच्या या सीरिजमध्ये भारतानं १-०ची आघाडी घेतली आहे. या मॅचमध्ये भारतानं टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला. इंग्लंडनं चांगली सुरुवात केल्यानंतर कुलदीप यादवच्या स्पिन बॉलिंगपुढे इंग्लंडच्या बॅट्समननी लोटांगण घातलं. इंग्लंडला २० ओव्हरमध्ये १५९ रनवर रोखण्यात भारतीय बॉलरना यश आलं.
१६० रनचा पाठलाग करताना शिखर धवन लवकर आऊट झाला. पण लोकेश राहुल आणि रोहित शर्मानं भारताची पडझड होऊ दिली नाही. नंतर विराट कोहलीनं रन बनवून भारताला विजय मिळवून दिला.