Team India Schedule 2024 : यंदाचं वर्ष टीम इंडियासाठी (India Cricket Team) अनलकी ठरलंय, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सर्वात मोठं आव्हान असणारा वर्ल्ड कप (ODI World Cup 2023) थोडक्यात हुकला. आशिया कप आणि बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवरील कब्जा, या व्यतिरिक्त मोठा पराक्रम टीम इंडियाला करता आला नाही. अशातच आता आगामी 2024 मध्ये टीम इंडियाचं शेड्यूल कसं असणार आहे? पाहुया...
दक्षिण आफ्रिकामध्ये सध्या सुरू असलेल्या टेस्ट मालिकेतील अखेरच्या सामना हा 2024 मधील पहिला सामना असणार आहे. त्यामुळे कॅप्टन रोहितची खऱ्या अर्थाने कसोटी लागेल. त्यानंतर टीम इंडिया अफगाणिस्तानविरुद्ध 11 ते 17 जानेवारीमध्ये 3 टी-ट्वेंटी सामने खेळणार आहे. तर त्यानंतर 25 जानेवारी ते 11 मार्च यादरम्यान पाच कसोटी सामने खेळण्यासाठी इंग्लंडचा संघ भारतात येईल. त्यानंतर टीम इंडिया ४ ते ३० जून तारखेला टी-ट्वेंटी वर्ल्ड कप वेस्टइंडिज आणि युएसएमध्ये खेळेल.
टी-ट्वेंटी वर्ल्ड कपनंतरच्या मालिका जाहीर झाल्या आहेत. मात्र, त्यांच्या तारखा समोर आल्या नाहीत. टीम इंडिया श्रीलंकेविरुद्ध 3 वनडे आणि 3 टी-ट्वेंटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. जुलैमध्ये ही मालिका खेळवली जाईल. तर त्यानंतर बांग्लादेशचा संघ दोन कसोटी आणि 3 टी-ट्वेंटी सामन्यांसाठी भारतात येणार आहे. तर त्यानंतर ऑक्टोबरमध्ये न्यूझीलंडविरुद्ध टीम इंडिया 3 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाला टेस्टमध्ये हरवण्यासाठी टीम इंडिया सज्ज होईल.
2023 मध्ये टीम इंडियाची विशेष कामगिरी
1. ऑस्ट्रेलियाविरुद्धची सलग तिसरी कसोटी मालिका जिंकून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर कब्जा केला.
2. टीम इंडिया आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा उपविजेता ठरली.
3. टीम इंडियाने श्रीलंकेत जाऊन आशिया कपवर कब्जा देखील मिळवला आहे.
4. महिला क्रिकेट संघाने चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत 2023 मध्ये सुवर्णपदक जिंकले.
5. पुरुष क्रिकेट संघाने 2023 मध्ये चीनमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावलं.
6. वनडे वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने जबरदस्त कामगिरी करत फायनलमध्ये जागा मिळवली होती. मात्र, ऑस्ट्रेलियाने फायनल जिंकली.
7. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर एकदिवसीय मालिका जिंकली.
8. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला एका कसोटी सामन्याच्या मालिकेत प्रथमच पराभूत कामगिरी महिला ब्रिगेडने केलीये.