Team India : टीम इंडियाच्या ( Team India ) महिला A टीम ने नवा इतिहास रचला आहे. हांगकांग महिला A टीमला नमवत टीम इंडियांच्या मुलींनी ही कामगिरी केलीये. एशियन क्रिकेट काऊंसिल कडून महिला इमर्जिंग टीम कपचं आयोजन करण्यात आलंय. यामध्ये टीम इंडियाच्या महिलांनी उत्तम खेळी करत हॉंगकाँगच्या टीमचा पराभव केलाय.
हॉंगकाँगविरूद्धच्या भारतीय महिला A टीमने टी-20 सामन्यात विरोधी टीमचा पराभव केला आहे. यामध्ये टीम इंडियाच्या गोलंदाजांच्या फिरकीने हॉंगकाँगची टीम अवघ्या 34 रन्सवर ऑलआऊट झाली. टीम इंडियाने हॉंगकाँगच्या टीमचा 9 विकेट्सने पराभव करत इतिहास रचलाय.
या सामन्यामध्ये हॉंगकाँगच्या मुलींची खराब फलंदाजी पहायला मिळाली. यावेळी भारतीय गोलंदाजांनी अवघ्या 34 रन्सवर विरोधी टीमला ऑल आऊट करत सामना आपल्या बाजूने फिरवून घेतला. यावेळी टीम इंडियाच्या ( Team India ) विजयाची खरी शिल्पकार ठरली ती श्रेयांका पाटील ( Shreyanka Patil ).
हाँगकाँगकडून मॅरिको हिलने सर्वाधिक रन्स केले आहेत. तिने 19 बॉल्समध्ये 14 रन्स केले. याशिवाय ओपनर नताशा माईल्सने 2 रन्स, शानझिन शहजादने 1 रन तर माराना लॅमलोला 5 रन्स करणं शक्य झालं. तर दुसरीकडे टीमच्या चार फलंदाज मरिना लॅम्पो, अॅलिसा हर्बड, मरियम बीबी, बेटी चॅन यांना भोपळाही फोडणं शक्य झालं नाही. अखेर 34 रन्सच्या स्कोरवर हॉंगकॉंगचा डाव आटोपला.
भारत विरूद्ध हाँगकाँग ( IND vs HKG ) यांच्यातील सामन्यात सहज असलेल्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या भारतीय टीमने अवघ्या 5.2 ओव्हरमध्ये सामना जिंकला. कर्णधार श्वेता सेहरावतने 2 रन्स करत विकेट गमावली. मात्र यू छेत्री आणि त्रिशाने भारतीय महिला अ टीमला विजय मिळवून दिला.
श्रेयांका पाटीलने ( Shreyanka Patil ) टीम इंडियाकडून ( Team India ) 3 ओव्हर्समध्ये 2 रन्स देत 5 विकेट्स काढल्यात. श्रेयांका पाटीलच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारतीय टीमने ( Team India ) सामना जिंकला. तिच्या या सर्वोत्तम कामगिरीनंतर तिला मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्डही देण्यात आलाय.