हरारे : तिसऱ्या आणि शेवटच्या वनडे सामन्यात टीम इंडियाने (Team india) झिम्बाव्बेला 290 धावांचे आव्हान दिले आहे. युवा बॅट्समन शुभमन गिलच्या (shubman gill) शानदार 130 धावांच्या शतकी कामगिरीच्या बळावर टीम इंडियाने 8 विकेट गमावून 289 ही धावसंख्या गाठली. त्यामुळे आता झिम्बाब्वे समोर 290 धावांचे आव्हान असणार आहे. आता झिम्बाब्वे हे आव्हान पुर्ण करते की टीम इंडिया विजय मिळवून क्लिप स्वीप करते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
टीम इंडियाचा (Team india) कर्णधार के एल राहूलने झिम्बाब्वेविरुद्ध टॉस जिंकून प्रथम बॅटींग करण्याचा निर्णय घेतला होता. शिखर धवन आणि के एल राहूल सलामीला उतरले होते. या दोघांनी भारताला चांगली सुरुवात करून दिली. मात्र मोठी धावसंख्या करण्यात हे दोन्ही खेळाडू अपय़शी ठरले. शिखर धवनने 40 तर राहूलने 30 धावा केल्या.
या दोघांच्या विकेट पडल्यानंतर मैदानावर उतरलेल्या ईशान किशन आणि शुभमन गिलने (shubman gill) मोर्चा सांभाळला. या दोघांनीही टीम इंडियाला मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाची भुमिका बजावली. ईशान किशन 50 धावा म्हणजेच अर्धशतक करून बाद झाला आहे. तर दिपक हुडा 1 धावा करून बाद झाला आहे. संजू सॅमसने 15 धावा केल्या आहेत. शार्दुल ठाकूरने 9 धावा, कुलदीप यादवने 2 धावा केल्या आहेत. तर शुभमन गिलने शानदार शतक ठोकत 130 धावा केल्या आहेत. या शानदार खेळीत त्याने 15 चौक्के आणि 1 षटकार लगावला.झिम्बाब्वेकडून ब्रॉड इव्हान्सने सर्वाधिक तीन विकेटस घेतले आहेत. तर सिकंदर राझाने 1 विकेट घेतलीय.
दरम्यान झिम्बाब्वे समोर 250 धावांचे आव्हान असणार आहे. हे आव्हान पुर्ण करून झिम्बाब्वे क्लीन स्वीप होण्यापासुन स्वत:ला रोखते की टीम इंडिया तिसरा विजय मिळवते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.