IND vs WI: सिरीज जिंकण्यासाठी टीममध्ये होणार मोठे बदल; 'हा' मॅचविनर खेळाडू बसणार बाहेर

सिरीज जिंकण्याच्या उद्देषाने प्लेइंग 11 मध्ये अनेक खेळाडूंचे पत्ते कापले जाऊ शकतात.

Updated: Aug 6, 2022, 08:10 AM IST
IND vs WI: सिरीज जिंकण्यासाठी टीममध्ये होणार मोठे बदल; 'हा' मॅचविनर खेळाडू बसणार बाहेर title=

मुंबई : टीम इंडियाने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला टी-20 सामना धमाकेदार शैलीत जिंकला होता, मात्र दुसऱ्या टी-२० सामन्यात विंडीज टीमने भारताचा विजयी रथ रोखला. तर टीम इंडियाने तिसऱ्या टी-20 सामन्यात वेस्ट इंडिजचा 7 गडी राखून पराभव करत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतलीये. आता चौथ्या T20 मध्ये टीममध्ये काही मोठे बदल पाहायला मिळतील. सिरीज जिंकण्याच्या उद्देषाने प्लेइंग 11 मध्ये अनेक खेळाडूंचे पत्ते कापले जाऊ शकतात.

पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या T20 सामन्यात सूर्यकुमार यादव कर्णधार रोहित शर्मासोबत सलामीला आला. सूर्यकुमार यादवची कामगिरी उत्कृष्ट राहिली असून तो टी-20 क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. तिसऱ्या T20 मध्ये त्याने मॅचविनिंग इनिंग खेळली. त्यामुळे हीच जोडी चौथ्या टी-20मध्येही खेळताना दिसण्याची शक्यता आहे.  

दुसरीकडे श्रेयस अय्यरला तिसरा क्रमांक दाखवता आलेला नाही. अशा स्थितीत त्यांच्या जागी दीपक हुड्डा यांना संधी मिळू शकते. हुड्डाने आयर्लंड दौऱ्यावर झंझावाती शतक झळकावलंय.

कशी असेल मिडिल ऑर्डर

हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंत यांना साजेशी कामगिरी करता आली नाही, पण हे दोघंही चांगले खेळाडू आहेत. त्यामुळे या दोघांना आजच्या सामन्यात संधी मिळू शकते. पहिल्या T20 सामन्यात दिनेश कार्तिकने आपला फिनिशर फॉर्म दाखवत सर्वांची मनं जिंकली. त्यामुळे सहाव्या क्रमाकांवर तो उतरू शकतो.

जडेजाचं होऊ शकतं कमबॅक

तिसऱ्या टी-20मध्ये रवींद्र जडेजाला विश्रांती देण्यात आली होती. मात्र, आता जडेजा कमबॅक करणार असून रविचंद्रन अश्विन आणि जडेजा ही जोडी पुन्हा मैदानावर पाहायला मिळू शकते. भुवनेश्वर कुमार वेगवान गोलंदाजीची जबाबदारी सांभाळेल. त्याला साथ देण्यासाठी अर्शदीप सिंगला स्थान मिळू शकते.