IND vs WI 3rd Odi | टीम इंडियाचा 96 धावांनी दणदणीत विजय, विंडिजला क्लीन स्वीप

टीम इंडियाने (Team India) वेस्टइंडिजवर (West Indies) तिसऱ्या वनडे सामन्यात 96 धावांनी विजय मिळवला आहे.  

Updated: Feb 11, 2022, 09:23 PM IST
IND vs WI 3rd Odi | टीम इंडियाचा 96 धावांनी दणदणीत विजय, विंडिजला क्लीन स्वीप title=
प्रातिनिधिक छायाचित्र

अहमदाबाद : टीम इंडियाने (Tea) वेस्ट इंडिजवर तिसऱ्या सामन्यात 96 धावांनी दणदणीत विजय साकारला आहे. या विजयासह टीम इंडियाने विंडिजला क्लीन स्वीप दिला आहे. रोहितसेनेने विंडिजला विजयासाठी 266 धावांचे आव्हान दिले होते. मात्र टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजीपुढे विंडिजचा 37.1 ओव्हरमध्येच 169 बाजार उठला. यासह रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 3-0 असा क्लीन स्वीप विजय मिळवला. (ind vs wi 3rd odi team india beat west indies by 96 runs and give clean sweep to windies at narendra modi stadium ahemedabad)

विंडिजकडून ओडेन स्मिथ आणि कर्णधार निकोलस पूरन या दोघांनी अनुक्रमे 36 आणि 34 धावांची खेळी केली. मात्र या व्यतिरिक्त कोणालाही टीम इंडियाने फार टिकू दिले नाही. 

टीम इंडियाकडून प्रसिध क्रिष्णा आणि मोहम्मद सिराजने प्रत्येकी 3 विकेट्स घेतल्या. तर कुलदीप यादव आणि दीपक चहर या दोघांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेत या दोघांना चांगली साथ दिली. 

दरम्यान आता वनडे सीरिजनंतर उभयसंघात टी 20 सीरिज खेळवण्यात येणार आहे. एकूण 3 सामन्यांची असेलल्या या मालिकेचं आयोजन हे कोलकातामधील ईडन गार्डनमध्ये खेळवण्यात येणार आहे.

टी 20 सीरिजसाठी टीम इंडिया : 

रोहित शर्मा (कर्णधार), ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, रिषभ पंत (विकेटकीपर), व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिश्नोई, दीपक हुड्डा, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर, आवेश खान आणि हर्षल पटेल. 

टी 20 मालिकेचं वेळापत्रक

पहिली टी 20 - 15 फेब्रुवारी 
दुसरी टी 20 - 18 फेब्रुवारी
तिसरी टी 20 - 21 फेब्रुवारी