IND vs SL : भारत आणि श्रीलंकेमध्ये तिसरा आणि मालिकेतील निर्णायक सामना (Ind vs Sl 3rd T20 Match) होणार आहे. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील सामना 1-1 ने बरोबरीत सोडवला गेला आहे. आज दोन्ही संघांसाठी 'करो या मरो' अशी परिस्थिती असून इतकंच नाहीतर हार्दिक पंड्यासालाही एक मोठं आव्हान आहे. भारताचा कर्णधार राहिलेला महेंद्रसिंह धोनी, विराट शर्मा आणि नियमित कर्णधार रोहित शर्मा यांनी मालिका विजयाचा रथ चालवला होता तो पांड्याला पूढे सुरू ठेवायचा आहे. (Ind vs Sl 3rd T20 Match srilanka will create history if they wins against india latets marathi Sport News)
श्रीलंका संघाने 2009 साली पहिली मालिका खेळली होती. धोनीच्या नेतृत्त्वाखाली पहिल्याच सामन्यात भारताचा पराभव झाला होता. दुसऱ्या सामन्यात भारतीय संघाने जबरदस्त कमबॅक केलं होतं. मालिका 1-1 अशी बरोबरीत संपवली होती. या मालिकेनंतर श्रीलंकेचा 2016 मध्ये 2-1, 2017 ला 3-0, 2020 मध्ये 2-0 आणि 2022 ला 3-0 असे व्हाईटवॉश देत भारताने मालिका जिंकल्या होत्या.
हार्दिक पांड्या अँड कंपनीला फक्त सामनाच नाहीतर भारतीय संघाता हा विजयरथ कायम ठेवण्याचं आव्हान असणार आहे. मालिकेतील दोन्ही सामने अटीतटीचे झालेले पाहायला मिळाले आहेत. पहिला सामनाही अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत गेला होता, अक्षर पटेलने शेवटचं षटक टाकत संघाला विजय मिळवून दिला होता.
दरम्यान, दसुन शनाकालाही त्याच्या नेतृत्त्वाखाली मालिका जिंकत विक्रम करण्याची मोठी संधी असणार आहे. श्रीलंकेच्या दिग्गजांना जे जमलं नाही ते त्याला करून दाखवण्यासाठी संधी आहे.
टी-20 सीरिजसाठी टीम इंडिया
हार्दिक पंड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप-कर्णधार), ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, संजू सॅमसन, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी आणि मुकेश कुमार.