Dinesh Karthik : दिनेश कार्तिकच्या 'त्या' सुपरकॅचची पुन्हा चर्चा

15 वर्षानंतरही दिनेश कार्तिकचा 'तो' अफलातून कॅच क्रिकेट फॅन्सना पुन्हा का आठवला?

Updated: Oct 30, 2022, 10:49 PM IST
Dinesh Karthik : दिनेश कार्तिकच्या 'त्या' सुपरकॅचची पुन्हा चर्चा title=

पर्थ : टी20 वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) टीम इंडियाची (Team India) विजयाची हॅट्ट्रीक हुकली आहे. दक्षिण आफ्रिकेने (South Africa) टीम इंडियाचा 5 विकेटस राखून पराभव केला आहे. या पराभवानंतर टीम इंडियाचा सेमी फायनल पर्यंत पोहोचण्याचा मार्ग अवघड झाला आहे. टीम इंडियाच्या पराभवानंतर दिनेश कार्तिकचा एक फोटो व्हायरल होत आहे. या त्याच्या फोटोची खुप चर्चा रंगली आहे. नेमका या फोटो मागचा इतिहास काय आहे तो जाणून घेऊयात.  

हे ही वाचा :  'या' 5 चुकांमुळे टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव, जाणून घ्या 

दिनेश कार्तिकचा (Dinesh Karthik) एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या फोटोत दिनेश कार्तिक विकेटच्या मागे कॅच घेताना दिसत आहे. ही कॅच इतकी खास नक्कीच नाही आहे की याची खुप चर्चा व्हावी. दिनेश कार्तिकने मोहम्मद शमीच्या बॉलवर टेम्बा बावूमाची ही कॅच घेतली होती. या कॅचने दक्षिण आफ्रिकेला (South Africa) तिसरा धक्का बसला होता. मात्र काही खास गोष्ट नसताना देखील त्याची चर्चा रंलगी आहेत. 

फोटोत काय?

दक्षिण आफ्रिकेविरूद्ध सामन्यात दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) डाव्या हाताने एक कॅच घेतली होती. या कॅचमुळे दक्षिण आफ्रिकेला तिसरा धक्का बसला होता. या फोटोत आणखीण फोटो जोडला गेला आहे. ज्यामध्ये दिनेशने त्याचप्रकारे विकेटच्या मागे कॅच घेतली आहे. दोन्ही कॅच एक सारख्याच होत्या. त्यामुळे असा प्रश्न पडलाय की या दोन्ही कॅचच कनेक्शन काय? 

'त्या' कॅचच कनेक्शन काय? 

दिनेश कार्तिकने (Dinesh Karthik) 2022 च्या वर्ल्ड कपमध्ये (T20 World Cup) दक्षिण आफ्रिकेविरूद्ध विकेटच्या मागे अशी कॅच घेतली होती. अशीच कॅच त्याने 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये देखील घेतली होती. आणि त्यावेळेस सुद्धा टीम इंडियासमोर साऊथ आफ्रिकाच होती. त्यामुळे हे एक कॅच कनेक्शन जुळतयं. विशेष म्हणजे हा 2007 चा वर्ल्ड कप महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने जिंकला होता. 

 
दरम्यान या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर (South Africa) 134 धावांचे लक्ष्य ठेवले होते. हे लक्ष्य दक्षिण आफ्रिकेने सहज पुर्ण करत 5 विकेट्सने हा सामना जिंकला. या विजयासह वर्ल्ड कपमधील टीम इंडियाचा (Team India) विजयरथ आफ्रिकेने रोखला आहे.