मुंबई : टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर सलग दोन्ही सीरिज गमवून आली. आधी कसोटी आणि नंतर वन डे सीरिज गमवल्यानंतर आता आणखी एक मोठा झटका मिळाला आहे. आयसीसीने टीम इंडियाला मोठा दंड लावला आहे. आधी सीरिज पराभूत झाले आता दंड भरण्याची वेळ टीम इंडियावर आली आहे.
रोहित शर्माला दुखापत झाल्यामुळे के एल राहुलकडे वन डेचं नेतृत्व देण्यात आलं होतं. के एल राहुलच्या नेतृत्वाखालील संघाला स्लो ओव्हर रेटसाठी मॅच फीच्या 40 टक्के दंड ठोठावण्यात आला.
एमिरेट्स आयसीसी एलिट पॅनेलचे मॅच रेफरी अँडी पायक्रॉफ्ट यांच्या ही गोष्ट पहिल्यांदा लक्षात आली. टीम इंडियाने निर्धारित वेळेपेक्षा 2 ओव्हर कमी टाकल्या होत्या. त्याचा दंड टीम इंडियाला भरावा लागणार आहे. आयसीसीने एक प्रसिद्धीपत्रक काढून यासंदर्भात माहिती दिली आहे.
India fined for slow over-rate in third ODI https://t.co/SsmaMz7oSl via @ICC
— ICC Media (@ICCMediaComms) January 24, 2022
के एल राहुलने आपली चूक मान्य केली असून संघाला बसलेला दंड देखील स्वीकारला आहे. अखेरचा सामना खूप रोमांचक होता. दीपकने जिंकण्याची संधी दिली होती. मात्र थोडक्यासाठी पराभवाचा सामना करावा लागला असं के एल राहुलने पत्रकार परिषदेत सांगितलं.
कोच राहुल द्रविड यांच्या म्हणण्यानुसार आणखी एक बदल टीम इंडियामध्ये अपेक्षित होता. जर तो झाला असता तर त्याचा फायदा संघाला झाला असता. रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्याची उणीव भासल्याचंही त्यांना सांगितलं.