आधी बॉलरला धुतलं...आता बॅटर्सचा 'फ्लॉप शो', वर्ल्ड कपच्या तोंडावर Team India चा दारूण पराभव

दक्षिण अफ्रिकेकडून भारताचा 49 धावांनी पराभव

Updated: Oct 5, 2022, 12:22 AM IST
आधी बॉलरला धुतलं...आता बॅटर्सचा 'फ्लॉप शो', वर्ल्ड कपच्या तोंडावर Team India चा दारूण पराभव title=

Team India: वर्ल्ड कपआधी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेमध्ये तिसरा टी 20 सामना (IND vs SA 3rd T20) झाला. भारत आणि साऊथ आफ्रिकेमध्ये खेळल्या (IND vs SA ) जाणाऱ्या टी-ट्वेंटी मालिकेत भारतीय खेळाडू जबरदस्त कामगिरी करत होते. मात्र, अखेरच्या सामन्यात भारतीय संघाला पराभव पत्कारावा लागला आहे. अखेरच्या सामन्यात भारताचा 49 धावांनी पराभव झाला.  ( South Africa Get Consolation Win, India Take Series 2-1)

तिसऱ्या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात भारतीय संघात तीन बदल करण्यात आले आहेत. केएल राहूल आणि विराट कोहलीला आराम देण्यात आला होता. दिग्गजांना आराम दिल्याने बेंचवरील खेळाडूंना संधी देण्यात आली होती. मात्र, या खेळाडूंना कमाल दाखवती आली नाही. 228 धावांचा पाठलाग करताना भारतीय संघ 178 धावांवर गारद झाला.

दक्षिण आफ्रिकेनं भारतासमोर 228 धावाचं आव्हान ठेवलं होतं. 228 धावांचा पाठलाग करताना भारताची फलंदाजी पत्त्यासाठी ढासाळली. रोहित शर्माला भोपळा फोडता आला नाही. दिनेश कार्तिकने सर्वाधिक 46 धावा केल्या. मात्र, इतर कोणत्याही खेळाडूला मोठी कामगिरी करता आली नाही. दीपक चहरने अखेरीस फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. त्याने 17 बॉलमध्ये 31 धावा केल्या. भारताने ही मालिका 2-1 ने जिंकली आहे.

त्यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेनं गडी 3 गमवून 227 धावा केल्या आणि विजयासाठी 228 धावा दिल्या. रिलीचं शतक आणि क्विंटनच्या अर्धशतकाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेनं धावांचा डोंगर रचला. रिलीनं 48 चेंडूत शतक ठोकलं. या खेळीत 7 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश आहे. क्विंटननं 43 चेंडूत 68 धावा केल्या. या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश आहे.