नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेने टीम इंडियावर पहिल्या टी 20 सामन्यात (Ind vs Sa 1st T20) 7 विकेट्सने शानदार विजय मिळवला आहे. टीम इंडियाने विजयासाठी दिलेले 212 धावांचे आव्हान आफ्रिकेने 5 बॉलआधी 3 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. या विजयासह आफ्रिकेने 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. डेव्हिड मिलर आणि रस्सी वैन डेर डूसन ही जोडी आफ्रिकाच्या विजयाची शिल्पकार ठरली. या जोडीने आफ्रिकेला विजय मिळवून दिला. (ind vs sa 1st t20i south africa beat team india by 7 wickets at arun jaitley stadium delhi)
डूसनने सर्वाधिक नाबाद 75 धावांची खेळी केली. तर डेव्हिड मिलरने नॉट आऊट 64 रन्स केल्या. या दोघांव्यतिरिक्त प्रिटोरियसने 29, कॅप्टन टेम्बा बावुमाने आणि क्विंटन डी कॉकने 22 धावांचं योगदान दिलं.
आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांची पिसं काढली. आफ्रिकेच्या खेळाडूंनी चौफेर फटकेबाजी करत आपल्या टीमला विजय मिळवून दिला. टीम इंडियाकडून अक्षर, हर्षल आणि भुवनेश्वर कुमार या तिकडीने प्रत्येकी 1 विकेट घेतला.
टीम इंडियाला हा सामना जिंकून सर्वाधिक सलग टी 20 सामने जिंकण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी होती. आतापर्यंत टीम इंडिया आणि अफगाणिस्तानच्या नावावर सुंयक्तरित्या 12 सलग सामने जिंकण्याचा विक्रम होता. त्यामुळे मुंबईला हा कारनामा करण्याची संधी होती. मात्र या पराभवासह टीम इंडियाने ही संधी गमावली.
दक्षिण आफ्रिका प्लेइंग इलेव्हन :
टेम्बा बावुमा (कप्तान), क्विंटन डी कॉक (विकेटकीपर), रीजा हेंड्रिक्स, डेविड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, वेन पार्नेल, ड्वेन प्रिटोरियस, केशव महाराज, तबरेज शम्सी, कैगिसो रबाडा आणि एनरिक नॉर्टजे.
टीम इंडिया की प्लेइंग इलेव्हन :
ऋषभ पंत (कॅप्टन/विकेटकीपर) ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, हार्दिक पांड्या, दिनेश कार्तिक, अक्षर पटेल, हर्षल पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि आवेश खान.