IND vs SA 1st ODI: 'बीसीसीआयमध्ये फक्त आणि फक्त राजकारण चालतं'

वाचा बीसीसीआयवर इतका गंभीर आरोप कोणी केला आहे? 

Updated: Oct 6, 2022, 06:39 PM IST
 IND vs SA 1st ODI: 'बीसीसीआयमध्ये फक्त आणि फक्त राजकारण चालतं' title=

लखनऊ : टीम इंडिया विरूद्ध दक्षिण आफ्रिकेचा (IND vs SA) पहिला वनडे सामना लखनऊमध्ये सुरू आहे.या सामन्यात दक्षिण आफ्रिकेची (south africa) पहिली बॅटींग सुरु असून त्यांनी एक सूसज्ज धावा गाठल्या आहेत. याच दरम्यान टीम इंडियाच्या (Team India) प्लेईंग इलेव्हनमध्ये एका खेळाडूला संघात स्थान न दिल्याने आता बीसीसीआय गंभीर आरोप होऊ लागले आहेत. नेमका हा खेळाडू कोण आहे? बीसीसीआय़वर (BCCI) काय गंभीर आरोप होत आहेत, हे जाणून घेऊयात.  

टीम इंडिया (Team India) लखनऊच्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेय एकना क्रिकेट स्टेडिअमवर (Bharat Ratna Shri Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium) शिखर धवनच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिकेविरुद्ध तीन सामन्यांच्या वनडे मालिकेतील पहिला सामना (IND vs SA 1st ODI) खेळत आहे. या सामन्यात कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) नाणेफेक जिंकून प्रथम बॉलिंगचा निर्णय घेतला होता.
 
सामन्याचे टॉस झाल्यानंतर दोन्ही संघानी त्यांची प्लेईंग इलेव्हन बद्दल माहिती दिली होती. याच टीम इंडियाच्या (Team India) प्लेईंग इलेव्हनमध्ये एका खेळाडूला स्थान देण्यात आले नव्हेत. या खेळाडूला संघात स्थान मिळाल्याने चाहते चांगलेच संतापले आहेत. 

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (IND vs SA) यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात यावर्षी देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या रजत पाटीदारला (Rajat Patidar) टीम इंडियाच्या प्लेइंग-11 मध्ये स्थान देण्यात आलेले नाही. पाटीदार यांच्या जागी ऋतुराज गायकवाड यांना संधी देण्यात आली आहे. दोन्ही खेळाडूंच्या कारकिर्दीतील हा पहिलाच वनडे सामना होता.मात्र ऋतुराजला संधी देण्यात आली. दरम्यान RCB साठी यंदाच्या आयपीएलमध्ये शतक झळकावणाऱ्या रजत पाटीदारला प्लेइंग-11 मध्ये स्थान न मिळाल्याने चाहते चांगलेच संतापले आहेत. 

चाहत्यांच्या सतंप्त प्रतिक्रिया? 
रजत पाटीदार (Rajat Patidar) संघात स्थान मिळाल्याने सिलेक्शन टीमवर टीका होतेय.एका युझरने म्हटलेय, भारतीय क्रिकेटमधील ही संस्कृती दयनीय आहे. रजत पाटीदार हा एक योग्य मधल्या फळीतील फलंदाज आहे. तरीही आम्हाला ईशान किशन सारखा ओपनर भरायचा आहे आणि जर तो चांगला खेळला नाही तर त्याला दोष द्यायचे आहे, असे म्हटले आहे.

तसेच दुसऱ्या य़ुझरने लिहले की, तो का खेळत नाहीत, रजत पाटीदारला (Rajat Patidar) का संधी मिळाली नाही? असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. तर तिसऱ्या य़ुझरने, रजत पाटीदार (Rajat Patidar) आणि राहूल त्रिपाठी सारख्या खेळाडूंना टीममध्ये खेळवायचं नसतं तर का घेऊन जातात, असा सवाल केला आहे. तर चौथ्या य़ुझरने रजत पाटीदार सोबत राजकारण होत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.