IND vs SA: वन डे सीरिजचं Live Streaming तुम्हाला कसं पाहता येणार जाणून घ्या

19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वन डे सीरिजचं शेड्युल कसं असेल आणि कुठे हे सामने तुम्हाला पाहता येणार 

Updated: Jan 18, 2022, 02:50 PM IST
IND vs SA: वन डे सीरिजचं Live Streaming तुम्हाला कसं पाहता येणार जाणून घ्या title=

मुंबई : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका वन डे सीरिज 19 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. 3 सामन्यांची वन डे सीरिज होणार आहे. या सीरिजमध्ये रोहित शर्मा कर्णधार म्हणून मैदानात उतरणार नाही. दुखापतीमुळे त्रस्त असलेल्या रोहितला या सीरिजमधून आराम देण्यात आला आहे. कर्णधारपदाची जबाबदारी या सीरिजपुरती के एल राहुलच्या खांद्यावर असणार आहे. 

19 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या वन डे सीरिजचं शेड्युल कसं असेल आणि कुठे हे सामने तुम्हाला पाहता येणार आहेत याबद्दल जाणून घेऊया. विराट कोहली धोनीच्या व्यतिरिक्त पहिल्यांदाच दुसऱ्या कर्णधाराच्या स्ट्रॅटजीनुसार मैदानात खेळताना दिसणार आहे. केपटाऊनमध्ये 23 जानेवारीपर्यंत वन डे सीरिज खेळवण्यात येणार आहे. 

पाहा कसं असणार शेड्युल 

पहिला वन डे सामना- 19 जानेवारी - दुपारी 2 वाजता - नाणेफेक दुपारी 1.30 वाजता 
 दुसरा वन डे सामना - 21 जानेवारी- दुपारी 2 वाजता-  नाणेफेक दुपारी 1.30 वाजता  
तिसरा वन डे सामना - 23 जानेवारी- दुपारी 2 वाजता-  नाणेफेक दुपारी 1.30 वाजता 
 
लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे होणार?

 स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर तुम्हाला या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येणार आहे. याशिवाय हॉटस्टार असेल तर तिथेही पाहता येणार आहेत. 

भारतीय संघ- केएल राहुल (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, रिषभ पंत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), युजवेंद्र चहल, आर अश्विन, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, जयंत यादव आणि नवदीप सैनी.