IND W vs PAK W : जेमिमाह रॉड्रिंग्जच्या पाकिस्तानविरूद्ध मॅच विनिंग खेळीच रहस्य आलं समोर

Womens T20 World Cup IND W vs PAK W : टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या महिलांनी पाकिस्तानच्या महिलांना पहिल्याच सामन्यात धुळ चारली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयाने टी-20 वर्ल्डकपमधील पहिला सामना भारताने खिशात घातला आहे. 

Updated: Feb 13, 2023, 02:00 PM IST
IND W vs PAK W : जेमिमाह रॉड्रिंग्जच्या पाकिस्तानविरूद्ध मॅच विनिंग खेळीच रहस्य आलं समोर  title=

Womens T20 World Cup IND W vs PAK W : महिला टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने धडाकेबाज सुरुवात केली आहे.  टीम इंडियाने (Team India) कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा (Pakistan) 7 विकेट्सने पराभव केला आहे. टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार जेमिमाह रॉड्रिंग्ज (Jemimah Rodrigues) ठरली. तिने 53 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली.या तिच्या खेळीच्या बळावर टीम इंडियाने 19 ओव्हरमध्येच हा सामना जिंकला.तसेच तिला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. या पुरस्कारानंतर तिने तिच्या मॅच विनिंग खेळीच रहस्य सांगितल.  

जेमिमाह रॉड्रिंग्ज काय म्हणाली? 

पाकिस्तानविरूद्द 53 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केल्यानंतर जेमिमाह रॉड्रिंग्जला (Jemimah Rodrigues) प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला होता. हा पुरस्कार तिने आपल्या कुटूंबियांना समर्पित केला. यावेळी ती म्हणाली की, ही खेळी माझ्यासाठी खरोखरच खूप खास आहे, मला काही काळापासून धावा काढता येत नव्हत्या, मी त्या प्रक्रियेत अडकली होती. पण देव कृतज्ञ आहे, तो बाकीची काळजी घेतो. मला हा पुरस्कार माझ्या पालकांना समर्पित करायचा आहे, ते येथे स्टेडियममध्ये बसले आहेत. 

आझाद मैदानात मुलांविरूद्ध क्रिकेट खेळली 

मी सपाट विकेटवर खेळत नव्हते, मी टर्निंग विकेटवर खेळले. मुंबईत मी त्यावेळी आझाद मैदानात गेले होते, तेथे मी मुलांविरुद्ध क्रिकेट खेळले.या मैदानावर सकाळी खुप दव असतं. ही मैदानं कोणीच झाकत नाही.अशा परिस्थितीत मला 14 वर्षांखालील मुलांसोबत क्रिकेट खेळावे लागले,असे जेमिमाह (Jemimah Rodrigues) म्हणाली. 

आझाद मैदानात मी 14 वर्षांखालील मुलांसोबत खेळले. त्यांच्यासोबत खेळताना भारतीय खेळाडू असल्याच्या दबावाची खेळावे लागले.कल्पना करा, जर मी माझी विकेट गमावली तर काय होईल? या मैदानात मी दबावाशी कसा सामना करावा हे शिकले,असे जेमिमाह (Jemimah Rodrigues) सांगते. 

असा रंगला वर्ल्ड कपचा सामना 

पाकिस्तानने (Pakistan) टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.मात्र पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली नव्हती. कर्णधार बिस्माह मारूफ हिने अर्धशतक झळकावत पाकिस्तान टीमचा स्कोर 4 विकेट्स 149 पर्यंत नेला. टीम इंडियाकडून राधा यादवने 2 तर दिप्ती शर्मा आणि पुजा वस्त्राकरने प्रत्येकी 1-1 विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियासमोर 150 धावांचे लक्ष्य होते.

पाकिस्तानने दिले्ल्या 150 धावांचा पाठलाग करायला उतरलेल्या टीम इंडियाची सुरूवात चांगली झाली नव्हती. यास्तिका भाटीया 17 धावावर आऊट झाली होती. त्यानंतर जेमिमाह रोड्रिग्स मैदानात उतरली होती. या दरम्यान जेमिमाह आणि शेफालीने मैदानात जम बसवला होता. मात्र शेफाली 33 धावा करून बाद झाली. त्यानंतर कर्णधार हरमनप्रीत कौर 16 धावावर बाद झाली. त्यावेळेस जेमिमाह आणि रिचा घोषने डाव सांभाळत पाकिस्तानच्या तोंडचा विजय खेचून आणला.  
टीम इंडियाकडून जेमिमा रोड्रिग्सने (Jemimah Rodrigues) सर्वाधिक 53 रन्सची अर्धशतकी खेळी केली. तर रिचा घोषनेही 31 रन्सची खेळी केली. अशाप्रकारे टीम इंडियाने पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. 

टी-20 वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाच्या महिलांनी पाकिस्तानच्या महिलांना पहिल्याच सामन्यात धुळ चारली आहे. टीम इंडियाने पाकिस्तानचा 7 विकेट्सने पराभव केला आहे. या विजयाने टी-20 वर्ल्डकपमधील पहिला सामना भारताने खिशात घातला आहे.