क्रिकेट स्टेडियमवर छत का लावत नाहीत? 'ही' आहेत कारणं

IND vs PAK, Cricket stadiums : एक भिडू तर म्हणला.. क्रिकेटला छप्पर असायला हवं. क्रिकेट स्टेडिअमवर छत का लावत नाहीत? याची कारण नेमकी काय आहेत, पाहुया...

Updated: Sep 11, 2023, 05:33 PM IST
क्रिकेट स्टेडियमवर छत का लावत नाहीत? 'ही' आहेत कारणं title=
docklands stadium

Cricket stadiums Roof : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना सुरू आहे. भारत-पाक म्हटलं की चर्चा असते ती खुन्नसची अन् राड्याची. मात्र, आता सध्या सर्वांची डोकेदुखी वाढलीये ती पावसाने. कालचा दिवस पावसाने वाया गेल्यानंतर आता क्रिडाविश्वास नाराजी व्यक्त केली जातीये. रिझर्व्ह डे असल्याने समाधान व्यक्त केलं जातंय. मात्र, आजच्या दिवशी देखील पावसाने वारंवार खोडा घातलाय. अशातच एका चहाच्या कट्ट्यावर चर्चा सुरू झालीये ती क्रिकेट स्टेडियमची. एक भिडू तर म्हणला.. क्रिकेटला छप्पर असायला हवं. क्रिकेट स्टेडिअमवर छत का लावत नाहीत? याची कारण नेमकी काय आहेत, पाहुया...

फुटबॉल असो वा हॉकी... मैदानाला छप्पर असतं. मात्र, क्रिकेटच्या मैदानाला छप्पर का नसतं? याची काही कारणं आहेत. जगात फक्त एकच स्टेडियम आहे. जिथं क्रिकेटच्या मैदानाला छप्पर आहे. ते मैदान आहे ते ऑस्ट्रेलियामध्ये. डॉकलँड्स स्टेडियममध्ये छप्पर आहे. जे बांधण्यासाठी खर्च देखील मोठा आहे. हे छप्पर बंद व्हायला अन् ओपन होण्यासाठी तब्बल 8 मिनिटांचा वेळ लागतो. तोपर्यंत पाऊस झाला तर मैदानात पूर्णपणे पावसाने ओलं होऊन जाईल. मैदानाला छप्पर बसवलं तर पूर्ण शक्यता असते की बॉल छप्पराला बसणार. त्यामुळे फुटबॉल अन् हॉकीसारख्या बारक्या मैदानात हे शक्य आहे. मात्र, क्रिकेटसारख्या मैदानात छप्पर असणं शक्य नाही. बॉलचा स्पीड अन् स्विंगसाठी मोकळं मैदान असणं गरजेचं आहे. नैसर्गिक वातावरणाशिवाय गोलंदाजी धार कमी पडू शकते. बंद मैदानात नेहमी लाईट्समध्ये खेळावं लागतं आणि क्रिकेट नैसर्गिक वातावरणात खेळला जातो. 

आणखी वाचा - ना पराभवाने हारला, ना दुखापतीने खचला... स्वप्नपूर्तीसाठी 'तो' म्होरक्या म्हणून आलाय!

क्रिकेटच्या मैदानात फलंदाजी करताना किंवा गोलंदाजी करताना अनेक फॅक्टर परिणामकारक असतात. त्यातील एक प्रकार म्हणजे गवत. क्रिकेटमध्ये पिचवरील गवत सामना फिरवण्याचं काम करतात. मात्र, नैसर्गिक सूर्यप्रकाशाशिवाय मैदानातील गवतावर मोठा परिणाम दिसून येतो. अनेक असे मैदान आहेत, जी खूप जुनी आहेत त्यामुळे त्यांच्यावर छप्पर बांधणं अवघड जाईल. त्याचबरोबर दुर्घटना होण्याची शक्यता असते. क्रिकेट फक्त काही देशांमध्ये खेळलं जातं आणि अनेक देश अशा प्रकारचे स्टेडियम बांधण्याच्या स्थितीत नाहीत. त्यामुळे सामने अनेकदा मोकळ्या ठिकाणी खेळवण्यात आल्याचं दिसून येतं.