मुंबई : भारतीय क्रिकेटच्या इतिहासात रविवार 24 ऑक्टोबर रोजी जे घडले ते यापूर्वी कधीही झाले नव्हते. वर्ल्ड कपच्या इतिहासात पाकिस्तानने भारताला कधीही हरवले नव्हते, पण हा इतिहास आयसीसी टी -20 वर्ल्ड कप -2021 मध्ये बदलला. या सामन्यापूर्वी 12 सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानविरुद्ध नेहमीच विजय मिळवला होता. यापैकी एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये सात आणि टी -20 वर्ल्ड कपमध्ये पाच वेळा विजयांचा समावेश करण्यात आला आहे, परंतु यावर्षी हे सगळं बदललं आणि पाकिस्तानने वर्ल्ड कपच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताचा पराभव केला.
दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर प्रथम फलंदाजी करताना भारताने सात गडी गमावून 151 धावा केल्या होत्या. पाकिस्तानने परंतु हे लक्ष्य गाठण्यासाठी पाकिस्तानला संपूर्ण ओव्हर खेळा खेळण्याची गरज लागली नाही, कारण त्यांनी हे लक्ष 17.5 ओव्हरमध्येच गाठलं.
भारत हा वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्याचा प्रबळ दावेदार असून देखील पाकिस्तान समोर का हरला? ज्या देशाच्या संघाने कधीही भारताला हरवले नाही मग या वेळी असं काय घडलं? भारताच्या या पराभवाची कारणे काय होती? हे जाणून घेऊयात.
खरेतर क्रिकेटमध्ये सलामीच्या जोडीची जबाबदारी संघाला मजबूत आणि दणदणीत सुरुवात करुन देण्याची आहे. मात्र भारताची सलामीची जोडी यामध्ये अपयशी ठरली. याची जबाबदारी रोहित शर्मा आणि केएल राहुल यांच्या खांद्यावर होती पण दोघेही अपयशी ठरले. या दोन्हीही फलंदाजांना शाहीन शाह आफ्रिदीने बाद केले.
टीममधील लोअर ऑर्डर खेळाडूंचे अपयश हे देखील भारताच्या पराभवाचे कारण होते. सुरुवातीच्या धक्क्यांनंतर विराट कोहली आणि ऋषभ पंत यांनी आपल्या टीमची जबाबदारी सांभाळली आणि 53 धावांची भागीदारी केली, पण ही भागीदारी तुटताच विराट कोहली एकटा पडला. लोअर ऑर्डर त्याला एकही असा जोडीदार सापडला नाही जो त्याला साथ देईल. रवींद्र जडेजा, हार्दिक पंड्या पूर्णपणे अपयशी ठरले आणि त्यामुळे भारताला मोठी धावसंख्या करता आली नाही.
असे म्हटले जाते की, टीम इंडियाचे सध्याचे बॉलर्स आक्रमक आहेत, ते आपल्या खेळाने कोणाचीही विकेट पाडू शकतात आणि ते कोणत्याही क्षणी खेळ पलटवू शकतात. परंतु या सामन्यात भारतीय गोलंदाजांना चांगली कामगिरी करता आली नाही आणि टीम 10 विकेट्सने पराभूत झाली म्हणजेच भारतीय गोलंदाजांनी एकही विकेट घेतली नाही.
पाकिस्तानच्या बाबर आझम आणि मोहम्मद रिझवानच्या जोडीने भारतीय गोलंदाजांना विकेट घेणे कठीण केले.
भारताला कुठेतरी सहाव्या गोलंदाजाची कमतरता आहे कारण त्याचे पाच मुख्य गोलंदाज अपयशी ठरले. अशा स्थितीत सहावा गोलंदाज असता तर कदाचित तो भारतासाठी काही आश्चर्यकारक कामगिरी करू शकला असता.
योग्य प्लेइंग इलेव्हन न निवडणे हे देखील एक कारण असू शकते. हार्दिक पंड्याला गोलंदाजी करता येत नाही, त्यामुळे त्याच्या जागी शार्दुल ठाकूरची निवड होऊ शकली असती. ठाकूर हा उत्तम गोलंदाज आहे आणि तो त्याच्या बॅटनेही चमत्कार करू शकतो. त्याचवेळी या मोठ्या सामन्यात वरुण चक्रवर्तीऐवजी रविचंद्रन अश्विनच्या अनुभवाला प्राधान्य देता आले असते.