IND vs NZ : भूवनेश्वर कुमारला खुणावतोय 'हा' वर्ल्ड रेकॉर्ड, जाणून घ्या

वर्ल्ड रेकॉर्डपासून इतक्या विकेट दुर आहे भूवनेश्वर कुमार, न्यूझीलंडविरुद्ध रेकॉर्ड करण्याची नामी संधी 

Updated: Nov 18, 2022, 12:04 AM IST
IND vs NZ : भूवनेश्वर कुमारला खुणावतोय 'हा' वर्ल्ड रेकॉर्ड, जाणून घ्या title=

IND vs NZ :टी20 वर्ल्ड कपमधील पराभव विसरून टीम इंडिया (Team India) पुन्हा मैदानात उतरायला सज्ज झाली आहे. हार्दिक पंड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली टीम इंडिया न्यूझीलंडविरूद्ध (India Vs New Zealand) तीन सामन्याची टी20 मालिका खेळणार आहे. या मालिकेला उद्यापासून सुरुवात होत आहे. या मालिकेत टीम इंडियाचा अनुभवी स्टार बॉलर भूवनेश्वर कुमारला (Bhuvneshwar Kumar) वर्ल्ड रेकॉर्ड करण्याची संधी आहे. आता या रेकॉर्डला तो गवसणी घालतो का हे आजच्या सामन्यातच कळणार आहे.  

भारताचा अनुभवी वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar Records)  खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये विश्वविक्रम मोडण्याच्या मार्गावर आहे. भुवनेश्वरला T20 क्रिकेटमध्ये मोठा टप्पा गाठण्यासाठी आणखी फक्त 4 विकेट्सची गरज आहे. 32 वर्षीय वेगवान गोलंदाजाने 2022 मध्ये टीम इंडियासाठी 36 विकेट घेतल्या आहेत. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील आगामी T20 मालिकेत (IND vs NZ ) भुवनेश्वरने (Bhuvneshwar Kumar Records)  4 विकेट घेतल्यास, तो एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरणार आहे. 

सर्वाधिक विकेट्सचा विक्रम

दरम्यान एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम आयर्लंडच्या जोशुआ लिटलच्या नावावर आहे. आयरिश गोलंदाजाने यावर्षी 26 सामन्यात 39 विकेट घेतले आहेत. तर भुवनेश्वर कुमारने 2022 मध्ये 30 सामन्यांत 36 विकेट घेतल्या आहेत. याआधी, भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar)  टी-20 विश्वचषकादरम्यान टी-20 फॉरमॅटमध्ये भारताचा सर्वकालीन आघाडीचा विकेट घेणारा गोलंदाज बनला होता.

दरम्यान भुवनेश्वर कुमारने (Bhuvneshwar Kumar) खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये एकूण 89 विकेट्स घेतल्या आहेत. भुवनेश्वरने टीम इंडियासाठी 85 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. 32 वर्षीय खेळाडूने 2012 मध्ये एम चिन्नास्वामी स्टेडियमवर पाकिस्तानविरुद्ध टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. 

दरम्यान न्युझीलंडविरूद्धच्या सामन्यात भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar Records) वर्ल्ड  रेकॉर्ड करतो का? याकडे क्रिकेट फॅन्सचे लक्ष लागले आहे.