IND vs NZ: पावसात भारतीय खेळाडू हा कोणता खेळ खेळतायत? पाहा Video

Ind vs Nz : सामना रद्द झाल्यानंतर चहल न्यूझीलंडच्या खेळाडूंसोबत नक्की कोणता गेम खेळतोय?

Updated: Nov 18, 2022, 02:30 PM IST
IND vs NZ: पावसात भारतीय खेळाडू हा कोणता खेळ खेळतायत? पाहा Video title=
(फोटो सौजन्य - BCCI)

India vs New Zealand 1st T20 Match : भारतीय संघाचा न्यूझीलंड (IND vs NZ) विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिलाच सामना रद्द करण्यात आलाय. वेलिंग्टनच्या स्काय स्टेडियमवर पावसामुळे हा सामना रद्द करण्यात आला. पावसामुळे टॉसही (Toss) होऊ शकला नाही. संततधार पाऊस आणि खराब हवामानामुळे सामना रद्द करावा लागलाय. बराच वेळ वाट पाहिल्यानंतरही पाऊस न थांबल्याने अखेर सामना रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत हार्दिक पांड्याकडे (hardik pandya) कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनाही विश्रांती देण्यात आली आहे. त्यांच्या जागी व्हीव्हीएस लक्ष्मण (VVS Laxman) हे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. 

मात्र या दरम्यान दोन्ही संघाच्या एका खेळाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पावसामुळे सामना सुरु होऊ शकल्याने दोन्ही संघांच्या क्रिकेटपटूंनी आपापसात फूटवॉली खेळण्यास सुरुवात केली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर हा व्हिडिओ शेअर केला आहे.

IND vs NZ पहिला टी-20 सामना रद्द, दुसरा सामना कुठे? जाणून घ्या

भारतीय खेळाडूंसोबत न्यूझीलंडच्या खेळाडूंनीही या खेळात सहभाग घेतला आहे. पावसामुळे दोन्ही संघांचे खेळाडू इनडोअर गेम खेळून वेळ घालवण्यासोबतच सराव करताना दिसत आहेत. हॉलच्या मधोमध खुर्च्या ठेवून या अनोख्या पद्धतीचा फुटबॉल खेळून टाइमपास करताना दिसत आहेत.

दरम्यान, भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील टी-20 मालिकेतील पहिला सामना वेलिंग्टन येथे होणार होता. टी20 विश्वचषक-2022 च्या उपांत्य फेरीत पराभूत झाल्यानंतर दोन्ही संघ स्पर्धेतून बाहेर पडले. या जागतिक स्पर्धेनंतर भारत आणि न्यूझीलंड प्रथमच आमनेसामने आले आहेत. या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघाचे कर्णधारपद अष्टपैलू हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात आले आहे. न्यूझीलंडची जबाबदारी केन विल्यमसनकडे आहे.