IND vs NZ Test Series 2021 | न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियात या स्टार खेळाडूचा समावेश होणार?

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडचा 3-0 ने पराभव केला. या टी 20 मालिकेनंतर उभयसंघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात (IND vs NZ Test Series 2021) येणार आहे. 

Updated: Nov 22, 2021, 08:56 PM IST
IND vs NZ Test Series 2021 | न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेत टीम इंडियात या स्टार खेळाडूचा समावेश होणार? title=

मुंबई : टीम इंडियाने टी 20 मालिकेत न्यूझीलंडला (IND vs NZ T20 Series 2021) क्लीन स्वीप दिला. रोहित शर्माच्या (Rohit Sharma) नेतृत्वाखाली टीम इंडियाने न्यूझीलंडचा 3-0 ने पराभव केला. या टी 20 मालिकेनंतर उभयसंघात 2 सामन्यांची कसोटी मालिका खेळवण्यात (IND vs NZ Test Series 2021) येणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडिया (Team India) सज्ज आहे. पहिल्या कसोटीत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत मुंबईकर अजिंक्य रहाणे (Ajinkya Rahane) संघाचं कर्णधारपद सांभाळणार आहे. त्यामुळे त्याच्या जागी मुंबईकर स्टार खेळाडूचा संघात समावेश केला जाणार असल्याची शक्यता आहे. (ind vs nz test series 2021 mumbaikar suryakumar yadav likely be added test squad against new zealand 1st test at kanpur)

कोण आहे तो खेळाडू? 

पहिल्या कसोटीत रोहितच्या जागी मुंबईकर सूर्यकुमार यादवला (Suryakumar Yadav) संधी मिळणार असल्याचं मिड डेच्या रिपोर्टमध्ये म्हंटलं आहे. रिपोर्टनुसार, सूर्याला कानपूरमध्ये होणाऱ्या पहिल्या कसोटीत स्थान मिळणार असल्याचं म्हंटलं आहे. तसेच एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, "सूर्याचं कसोटी संघात आगमन होऊ शकतं. सूर्या कोलकातावरुन कानपूर जावून टीम इंडियासोबत जोडला जाईल". 

याआधी सूर्या इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघासोबत जोडला गेला होता. सूर्याला आणि पृथ्वीला श्रीलंका दौऱ्यानंतर थेट इंग्लंडला पाठवण्यात आलं होतं. मात्र तिथे सूर्याला कसोटी संघात अंतिम 11 मध्ये स्थान मिळालं नाही. 

सूर्याने टीम इंडियाकडून टी 20 आणि वनडे डेब्यू केलं आहे. मात्र तो अजूनही कसोटी पदार्पणाची वाट पाहत आहे. त्यामुळे सूर्याला पहिल्या सामन्यात कसोटी पदार्पण करण्याची संधी मिळणार का, याकडे सर्वांचेच लक्ष असणार आहे. 

सूर्याची न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेतील कामगिरी

मुंबईकर सूर्याने न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या टी 20 सामन्यात 62 धावांची शानदार अर्धशतकी खेळी केली. मात्र त्यानंतर तो अपयशी ठरला. उर्वरित 2 सामन्यात तो अनुक्रमे 1 आणि शून्यावर बाद झाला. सूर्याने 77 प्रथम श्रेणीतील सामने खेळले आहेत. यात त्याने 44 च्या सरासरीने 5 हजार 326 धावा केल्यात. यात 14 शतक आणि 26 अर्धशतकांचा समावेश आहे.

पहिल्या कसोटीसाठी रहाणेकडे नेतृत्व

पहिल्या कसोटीत टीम इंडियाचा नियमित कर्णधार विराट कोहलीला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे पहिल्या कसोटीत अजिंक्य रहाणेच्या खांद्यावर टीम इंडियाची धुरा असणार आहे. विश्रांतीनंतर  दुसऱ्या कसोटीत विराट संघासोबत जोडला जाणार आहे.

तिघांना कसोटी पदार्पणाची संधी

बीसीसीसीआयने या कसोटी मालिकेसाठी तिघांना संधी दिली आहे. यामध्ये श्रेयस अय्यर, केएस भरत आणि प्रसिद्ध कृष्णा यांना संधी मिळाली आहे.   
 
न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी टीम इंडिया | अजिंक्य रहाणे (कर्णधार), चेतेश्वर पुजारा (उपकर्णधार), केएल राहुल, मयंक अग्रवाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, रिद्धिमान साहा (विकेटकीपर), केएस भरत (रिझर्व्ह विकेटकीपर), रवींद्र जडेजा, आर अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्द कृष्णा.

टेस्ट सीरिजसाठी न्यूझीलंड टीम | केन विलियमसन (कर्णधार), टॉम लॅथम, डेवेन कॉनवे, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), हेनरी निकोल्स, रॉस टेलर, विल यंग, रचिन रविंद्र, टीम साउदी, कायले जेमीन्सन, नील वॅगनर, मिचेल सँटनर, ऐजाज पटेल, विल समरविल आणि ग्लेन फिलिप्स.

कसोटी मालिकेचे वेळापत्रक

पहिली कसोटी, 25 ते 29 नोव्हेंबर, कानपूर.  

दुसरी कसोटी, 3 ते 9 डिसेंबर, मुंबई.