IND vs NZ 3rd T20 : टीम इंडियासमोर इतक्या धावांचे आव्हान

टीम इंडियाला मालिका विजयाची संधी, न्यूजीलंडने दिले इतक्या धावांचे लक्ष्य 

Updated: Nov 22, 2022, 03:40 PM IST
IND vs NZ 3rd T20 : टीम इंडियासमोर इतक्या धावांचे आव्हान title=

IND vs NZ 3rd T20 : तिसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाच्या भेदक गोलंदाजीसमोर न्युझीलंडचा डाव 160 धावात आटोपला आहे. न्युझीलंडकडून डेवॉन कॉन्वे (Devon Conway) आणि ग्लेन फिलिप्सच्या (Glenn Phillips) अर्धशतकी खेळी केली होती.तर टीम इंडियाकडून  मोहम्मद सिराजने आणि अर्शदिप सिंहने प्रत्येकी 4 तर हर्षल पटेलने 1 विकेट घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर 161 धावांचे आव्हान असणार आहे. न्यूजीलंडने दिलेले हे लक्ष्य पुर्ण करून टीम इंडियाचा मालिकेत विजय मिळवण्याचा इरादा असणार आहे.  

हे ही वाचा : ऑस्ट्रेलियन खेळाडूच मैदानावर अनोख सेलिब्रेशन, VIDEO झाला व्हायरल 

न्यूजीलंडचा कर्णधार टिम साउदीने (TIm Southee) टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. मात्र न्यूजीलंडची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर फिन एलेन 3 धावावरचा बाद झाला. तर एलेन नंतर मार्क 12 धावावर आऊट झाला. त्यानंतर मैदानात असलेल्या डेवॉन कॉन्वे (Devon Conway) आणि ग्लेन फिलिप्सने (Glenn Phillips) फलंदाजीची कमान सांभाळली. डेवॉन कॉन्वेने 49 बॉलमध्ये 59 धावा केल्या. या खेळीत त्याने 4 चौकार आणि 2 षटकार लगावले. तर ग्लेन फिलिप्सने 33 बॉलमध्ये 54 धावा ठोकल्या.या खेळीत त्याने 5 चौकार आणि 3 षटकार लगावले. या दोघांची विकेट गेल्यानंतर न्यूजीलंडचा डाव पुर्णत गडगडला आणि 160 धावांवर आटोपला. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराजने आणि अर्शदिप सिंहने प्रत्येकी 4 विकेट घेतल्या आहेत. तर हर्षल पटेलने 1 विकेट घेतली आहे. 

न्यूजीलंडने (New Zealand) टीम इंडियासमोर 161 धावांचे लक्ष्य ठेवले आहेत. आता हे आव्हान पुर्ण करून टीम इंडिया मालिका जिंकते की न्यूजीलंड त्यांना रोखण्यात यशस्वी ठरतो, हे पाहावे लागणार आहे.