IND vs NZ 2nd ODI : भारत आणि न्यूझीलंडमधील दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ( IND vs NZ 2nd ODI) भारताच्या वेगवान माऱ्यासमोर किवींनी नांगी टाकली आहे. 108 धावांवर न्यूझीलंडचा संघ गारद झाला आहे. याआधीही टीम इंडियाने न्यूझीलंडला कमी धावसंख्येवर ऑलआऊट केलं आहे. भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वाखाली भारतीय संघाने ही कामगिरी केली होती. (New Zealand lowest score in IND vs NZ 2nd ODI latets marathi Sport News)
टीम इंडियाने 29 ऑक्टोंबर 2016 साली न्यूझीलंडला विशाखापटनममधील एकदिवसीय सामन्यामध्ये अवघ्या 79 धावांवर ऑल आऊट केलं होतं. भारताने पहिल्यांदा बॅटींग करताना 269 / 6 धावा केल्या होत्या. रोहित शर्माने सर्वाधिक 70 धावा तर विराट कोहलीने 65 धावा केल्या होत्या. तर धोनीनेही 41 धावा करत संघाला 250 धावांचा टप्पा पार करून दिला होता.
न्यूझीलंडचा संघ 269 धावांचा पाठलाग करताना फक्त 79 धावा करू शकला होता. त्यावेळी भारताकडून अमित मिश्राने 5 गडी बाद करत किवींच्या अर्ध्या संघाला माघारी धाडलं होतं. अक्षर पटेलने 2 तर उमेश यादव, जसप्रीत बुमराह आणि जयंत यादव यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला होता.
न्यूझीलंडचा भारताविरूद्धचा सर्वाता कमी स्कोर होता. त्यानंतर 10 डिसेंबर 2010 मध्ये भारताने न्यूझीलंड संघाला 103 धावांवर ऑल आऊट केलं होतं. आज रोहितच्या नेतृत्त्वाखाली भारताने 108 धावांवर ऑल आऊट करत तिसऱ्यांदा सर्वात कमी धावसंख्येवर न्यूझीलंड संघाला ऑल आऊट केलं आहे.
दरम्यान, टीम इंडियाकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक म्हणजेच 3 विकेट्स घेतले. तर हार्दिक पंड्या आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी 2-2 विकेट्स घेतल्या आहे. मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि कुलदीप यादवला प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली.