IND vs NZ, 1st ODI: Shubman Gill चं बॅक टू बॅक शतक, वर्ल्ड कपच्या संघात दावेदारी ठोकणार?

India vs New Zealand ODI :पहिल्याच सामन्यात भारताचा यंग खेळाडू शुभमन गिलने (Shubman Gill) धमाकेदार शतक ठोकलं आहे. फक्त 87 चेंडूत त्याने ही कामगिरी केली.

Bollywood Life | Updated: Jan 18, 2023, 04:32 PM IST
IND vs NZ, 1st ODI: Shubman Gill चं बॅक टू बॅक शतक, वर्ल्ड कपच्या संघात दावेदारी ठोकणार? title=
Shubman Gill Century

Shubman Gill Century : भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील सुरू असलेल्या एकदिवसीय मालिकेतील सलामीचा सामना सध्या सुरू आहे. हैदराबादच्या राजीव गांधी इंटरनॅशनल स्टेडियमवर (Rajiv Gandhi International Stadium) हा सामना खेळवला जात आहे. सामन्यात भारताने धमाकेदार सुरूवात केल्याचं पहायला मिळतंय. पहिल्याच सामन्यात भारताचा यंग खेळाडू शुभमन गिलने (Shubman Gill) धमाकेदार शतक ठोकलं आहे. फक्त 87 चेंडूत त्याने ही कामगिरी केली. (IND vs NZ 1st ODI Shubman Gill back to back centuries claim World Cup squad marathi news)

शुभमन गिलने श्रीलंकेविरुद्धच्या (Shubman Gill 2nd Century) शेवटच्या एकदिवसीय सामन्यात शतक झळकावलं होतं. मात्र, किंग कोहलीच्या (Virat kohli) धमाकेदार दिडशेच्या खेळीपुढे शुभमनचं शतक फिक्कं पडलं. अशातच आता आणखी एका संधीचं सोनं करत शुभमनने बॅक टू बॅक शतक (shubman gill back to back centuries) ठोकलं आहे. गेल्या 11 डावात 3 शतके झळकावली आहेत. त्यामुळे सध्या शुभमनची चर्चा होताना दिसत आहे.

प्रथम टॉस जिंकून भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला. कॅप्टन रोहितचा (Rohit Sharma) निर्णय दोन्ही सलामीवीरांनी खरा ठरवला. दोघांनी चांगली सुरूवात करून दिली. पहिल्या 10 ओव्हर दोघांनी खेळून काढल्या. 13 व्या ओव्हरमध्ये कॅप्टन रोहित 34 धावा करून तंबुत परतला. त्याला शुभमनने (Shubman Gill) साथ दिली. त्यानंतर मैदानात आलेल्या विराट कोहलीला (Virat Kohli) जास्तवेळ मैदानात टिकता आलं नाही. तो 8 धावा करून बाद झालाय. त्यानंतर सूर्याने आणि इशान किशनने (Ishan Kishan) भारताला सावरण्याचा प्रयत्न केला.

Arjun Tendulkar ने घेतला कॅप्टन रोहितशी पंगा? म्हणाला "मी सहमत नाही, एवढी मेहनत करायची अन्...

दरम्यान, सूर्यकुमारने वादळी खेळी सुरू केल्यानंतर कॅप्टन टॉम लेथमने (Tom Latham)  स्पिनर्सचा मारा सुरू केला. त्यानंतर सूर्यकुमार 31 धावा करून बाद झाला. त्याचवेळी शुभमन गिलने एक बाजू सांभाळत भारताला मोठी धावसंख्या उभी करून दिली. शेवटचं वृत्त हाती आलं, त्यावेळी (Ind vs Nz, 1st ODI) भारताच्या 40 ओव्हरमध्ये 249 धावा झाल्या आहेत.