मुंबई: इंग्लंड विरुद्ध तीन फॉरमॅटमध्ये विराट सेनेनं मोठं यश मिळवलं आहे. एकामागोमाग एक सीरिजमध्ये टीम इंडियाला जबरदस्त यश मिळालं. भारत विरुद्ध इंग्लंड 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघानं 3-1 ने विजय मिळवला. त्यापाठोपाठ झालेल्या 5 टी 20 सामन्यांच्या मालिकेत 3-2 ने दणदणीत विजय मिळवला. आता वन डे सीरिजमध्ये टीम इंडियाला आपलं वर्चस्व कायम राखण्यात यश आलं आहे.
कसोटी मालिका
इंग्लंड विरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत भारतीय संघानं विजय मिळवला आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा तिकीट पक्क झालं. हा अंतिम सामना न्यूझिलंड विरुद्ध होणार आहे. हा सामना साधारण 18 ते 22 जून रोजी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या कसोटी मालिकेत वॉशिंग्टन सुंदर, रोहित शर्मा, ऋषभ पंत, अश्विन आणि अक्षर पटेलनं दमदार कामगिरी केली होती.
टी 20 मालिका
इंग्लंड विरुद्ध झालेल्या 5 टी 20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियानं 3-2ने विजय मिळवला. शेवटच्या सामनयामध्ये भुवनेश्वर कुमारने जोस बटलरला इंग्लंडला 13 व्या षटकात हार्दिक पांड्याच्या हाती पाचव्या चेंडूवर कॅच आऊट केलं. या विकेटने सामन्याचा नकाशाच बदलला. जोस बटलरसारखा धोकादायक फलंदाज क्रीजवर असता तर इंग्लंडने हा सामना आणि मालिका जिंकली अगदी सहज जिंकली असती. हा धोका दूर करण्यात पांड्या आणि भुवीला यश मिळालं.
वन डे मालिका
वन डे सीरिजमध्ये 1-1 अशी दोन्ही संघांनी बरोबरी साधल्यानंतर अखेरचा सामना अटीतटीचा झाला. अवघ्या 7 धावांनी टीम इंडियाला मालिका जिंकण्यात यश आलं आहे. यामध्ये भुवी आणि शार्दुल ठाकूरचा मोठा वाटा आहे.तर फलंदाजीमध्ये तिसऱ्या वन डे सामन्यात ऋषभ पंत, हार्दिक पांड्या आणि शिखर धवन यांनी अर्धशतक शेवटच्या वन डे सामन्यात केलं. यांची फलंदाजीची कामगिरी विशेष मोलाची ठरली. तर शार्दुल ठाकूरनं अखेरच्या सामन्यात 4 भुवीने 3 वेकेट्स घेतल्या. टी नटराजननं एक विकेट घेतली.