मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड 5 टी 20 सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. संध्याकाळी 7 वाजता या सामन्याला सुरुवात होईल. इंग्लंडनं या मालिकेत 2-1नं आघाडी घेतली आहे. आजचा सामना जिंकणं भारतीय संघासाठी आव्हानात्मक असणार आहे. या सामन्यात पराभव झाला तर भारतीय संघाला मालिका गमवावी लागेल.
ही मालिका जिंकण्यासाठी भारतीय संघाला 4 गोष्टी कराव्या लागणार आहेत. त्या कोणत्या जाणून घेऊया
1. टॉस जिंका सामना जिंकता येईल
पहिल्या तीन सामन्यांमध्ये दोन नाणेफेक इंग्लंडने जिंकले होते. तर एका सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली. ज्या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकली त्यामध्ये भारतीय संघाचा विजय झाला.त्यामुळे आताच्या सामन्यात भारताला टॉस जिंकणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे.
2. के एल राहुल ऐवजी धनव किंवा सूर्यकुमारला संधी
टी 20 तिन्ही सामन्यात के एल राहुलनं खूपच वाईट कामगिरी केली आहे. केवळ एक धावा काढण्यात त्याला यश मिळालं तर दोन सामन्यात शून्यवर आऊट झाला. सलग फ्लॉप कामगिरी राहिल्यामुळे त्याला संघातून बाहेर करण्यात यावं अशी मागणी अनेकांनी केले आहे. तर त्याऐवजी शिखर धवन किंवा सूर्यकुमार यादवला संधी दिली तर फायद्याचं होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
3 मार्क वुड आणि जोफ्रा आर्चर
इंग्लंडचे मार्क वुड आणि जोफ्रा आर्चर या दोन गोलंदाजांना बळी न पडण्याचं आव्हान फलंदाजांसमोर आहे. त्यामुळे या दोन्ही गोलंदाजांचे चेंडू टोलवणं आणि त्यांना आऊट करण्याची संधी मिळू न देणं फलंदाजांच्या हातात असणार आहे. त्यामुळे या दोन्ही गोलंदाजांपासून भारतीय संघाला सावध राहण्याची गरज आहे.
4. फील्डिंगमध्ये सुधारणा
तिसऱ्या टी 20 सामन्यामध्ये भारतीय संघाची फील्डिंग अत्यंत वाईट होती. अनेक साधे कॅचही सोडण्यात आले. तर रन आऊट करायची संधीही टीम इंडियानं अगदी सहज गमवली. त्यामुळे फील्डिंग मजबूत करण्याची गरज आहे.