पंतला कोरोना युरो कपमुळे नाही, तर समोर आलं खरं कारण...

फुटबॉल मॅचमुळे नाही तर या कारणामुळे ऋषभ पंतला झाला असावा कोरोना

Updated: Jul 16, 2021, 03:46 PM IST
पंतला कोरोना युरो कपमुळे नाही, तर समोर आलं खरं कारण... title=

मुंबई: भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याआधी टीम इंडियावर कोरोनाचं संकट आलं आहे. कसोटी सीरिजआधी विकेटकीपर ऋषभ पंतला कोरोनाची लागण झाली आहे. त्यापाठोपाठ सपोर्ट स्टाफचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानं खळबळ उडाली आहे. सध्या कोरोना पॉझिटिव्ह आलेले सर्वजण आयसोलेशनमध्ये आहेत. मात्र आता टेन्शन वाढलं आहे. ऋषभला कोरोनाची लागण कशी झाली असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

फुटबॉल सामना पाहायला गेला असताना तिथे मास्क न घातल्यामुळे सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं. तिथेच कोरोना झाला असावा अशी चर्चा आहे. मात्र एक धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या रिपोर्टनुसार कोरोनाची लागण नेमकी कुठून झाली हे सांगणं कठीण आहे. मात्र तो दातांच्या डॉक्टरकडे गेला असताना हा संसर्ग झाल्याचं सांगितलं जात आहे. 

8 जुलैला ऋषभ पंतची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. 8 दिवस तो क्वारंटाइन असणार आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार 5 आणि 6 जुलैला पंत दातांच्या डॉक्टरकडे गेला होता. त्यानंतर 2 दिवसांत त्याची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली. त्यामुळे तिथून संक्रमण झालं असावं असं सांगण्यात आलं आहे. 

29 जून रोजी पंत इंग्लंड आणि जर्मनी यांच्यात युरो 2020 चा सामना पाहण्यासाठी वेम्बली स्टेडियमवर गेला होता. पंत कोरोना पॉझिटिव्ह असल्याबद्दल बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले होते, “ब्रेकदरम्यान टीम हॉटेलमध्ये नसलेला पंत 8 जुलैला पॉझिटिव्ह आला होता. त्यामध्ये असिम्प्टमॅटिक लक्षणे आढळली आहेत. सध्या त्याला क्वारंटाइन करण्यात आलं आहे. बीसीसीआयची वैद्यकीय पथक सातत्याने त्याच्यावर नजर ठेवत आहे.