India Vs England Tests Series : मोहम्मद शमी (Mohammad Shami) संघात असता तर चित्र वेगळं असलं असतं, असं म्हणत रोहित शर्माने साऊथ अफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यानंतर भारदस्त वक्तव्य केलं होतं. वर्ल्ड कप स्टार मोहम्मद शमीने आपल्या दिमाखदार कामगिरीने भल्या भल्या फलंदाजांना गारद केलंय. त्यामुळे वर्ल्ड कपनंतर देखील त्याची कमी सर्वांना भासल्याचं दिसून आलं आहे. अशातच आता वर्ल्ड कप स्टार मोहम्मद शमीबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता कॅप्टन रोहित शर्माचं (Rohit Sharma) टेन्शन देखील वाढलंय.
शमी संघातून 'आऊट'
मोहम्मद शमीच्या घोट्याला दुखापत (Mohammed Shami Injury) झाली होती, त्यामुळे साऊथ आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिकेला तो मुकला होता. शमीची ही दुखापत गंभीर स्वरुपाची असल्याने तो संघासाठी खेळणार नाही, हे निश्चित होतं. मात्र, आता मोहम्मद शमी आगामी इंग्लंडविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेत देखील खेळू शकणार नाही, अशी माहिती समोर आली आहे.
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, मोहम्मद शमीने अद्याप गोलंदाजीला सुरुवातही केलेली नाही, तो इंग्लंडविरुद्धचे पहिले दोन कसोटी सामन्यातून बाहेर पडू शकतो. मोहम्मद शमीने अद्याप गोलंदाजी सुरू केलेली नाही. शमीला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) जाऊन फिटनेस सिद्ध करावं लागेल. त्यामुळे तो इंग्लंडविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे, असं बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
टीम इंडियाचा संभाव्य कसोटी संघ
रोहित शर्मा (C), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन (विकेटकीपर), केएल राहुल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.