IND vs ENG: उगाच म्हणत नाही King Kohli, विराटचा शॉट पाहून वोक्सही आवाक्...पाहा Video

T20 World Cup 2nd Semi-final: क्रिस वोक्सने (Chris Woakes) के एल राहूलला बाद केलं. त्यानंतर मात्र, विराट कोहली (Virat Kohli) मैदानात आला. विराटचा जोश पाहून...

Updated: Nov 10, 2022, 02:36 PM IST
IND vs ENG: उगाच म्हणत नाही King Kohli, विराटचा शॉट पाहून वोक्सही आवाक्...पाहा Video title=
Ind VS Eng live match update Virat Kohli

Virat Kohli: भारत आणि इंग्लंड (Ind VS Eng) यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना  (1st Semi-final) खेळला जात आहे. फायनलचं तिकीट मिळवण्यासाठी कोणत्याही परिस्थितीत भारताला हा सामना जिंकावा लागणार आहे. तर दुसरीकडे इंग्लंड देखील सामना जिंकून फायनलसाठी (T20 World Cup Final) फ्लाईट पकडण्यासाठी उत्सुक आहे. अशातच रंगतदार सुरूअसलेल्या सामन्यात टीम इंडियाची सुरूवात खास झाल्याचं दिसत नाही. भारताचा दोन्ही सलामीवीर तंबूत परतले आहेत.

टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या इंग्लंडची सुरूवात चांगली झाली. स्टार गोलंदाज क्रिस वोक्सने (Chris Woakes) के एल राहूलला बाद केलं. त्यानंतर मात्र, विराट कोहली (Virat Kohli) मैदानात आला. विराटचा जोश पाहून मैदानात असलेल्या रोहितने जबाबदारी खांद्यावर घेतली आणि मैदानात चौफेर फटकेबाजी सुरू केली.

आणखी वाचा -IND vs ENG : सूर्यकुमार नाही तर 'या' घातक फलंदाजापासून इंग्लंडला धोका; केल्यात सर्वाधिक धावा

कॅप्टनचं आक्रमण पाहून विराटच्याही अंगात उत्साह संचारला. विराटने इंग्लंडच्या स्टार गोलंदाजाच कवर ड्राईव्हच्या (Cover Drive) वरून शानदार षटकार खेचला. हा षटकार पाहून अनेकांचे डोळे उघडेच्या उघडे राहिलेत. त्यानंतर विराटचा शॉट पाहून वोक्सचा चेहरा देखील पाहण्याजोगा होता.

पाहा व्हिडीओ- 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by ICC (@icc)

दरम्यान, नुकत्याच हाती आलेल्या वृत्तानुसार भारताच्या 12 षटकात 15 धावा झाल्या आहेत. सुर्यकुमार यादव, के एल राहूल आणि रोहित शर्मा तंबूत परतले आहेत. हा सामना जिंकून पाकिस्तानशी पुन्हा दोन हात करण्याची संधी भारताला मिळू शकते.