Stuart Broad On Cheteshwar Pujara : रांचीमध्ये सुरू असलेल्या चौथ्या कसोटी (IND vs ENG Ranchi test) सामन्यात भारतीय फलंदाजी ढेपाळल्याचं पहायला मिळालं. फिरकी खेळपट्टीवर इंग्लंडच्या शोएब बशीर आणि टॉम हार्टले या दोन गोलंदाजांसमोर टीम इंडियाचे (Team India) खेळाडूंना टिकू दिलं नाही अन् टीम इंडियाला अडचणीत टाकलं. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडियाच्या 7 गड्यांच्या बदल्यात 219 धावा झाल्या आहेत. फिरकी खेळपट्टीवर टीम इंडियाच्या युवा फलंदाजांना नांगर टाकता आला नाही. त्यावरून आता स्टुअर्ड ब्रॉडने (Stuart Broad) सिलेक्टर्सचा खरपूस समाचार घेतला आहे.
काय म्हणाला स्टुअर्ड ब्रॉड ?
सध्याच्या सुरू असलेला कसोटी सामना मी जास्त पाहिला नाही. पण मला विश्वास आहे की इंग्लंड सध्या आघाडीवर आहे. एखाद्या खेळाडूचं स्वप्न असतं अशी पीच पहायला मिळते. खेळपट्टीवर क्रॅक्स दिसत आहेत. फिरकीपट्टूंचा बॉल अचूक आणि अनपेक्षित उसळी घेतोय. टॉस जिंका आणि बॅटिंग करा, असं सोप्पं गणित आहे. मात्र, बुमराहला विश्रांती का दिली गेली? याचं उत्तर मला कळालं नाही, असं स्टुअर्ड ब्रॉडने म्हटलं आहे.
मी प्रामुख्याने इंग्लंडबद्दल ट्विट करतो, पण भारताबद्दल आपण पाहिलं तर, भारतातील संघ सपाट कसोटी खेळपट्ट्यांवर एक अप्रतिम आहेत जिथं त्यांच्या फिरकीपटूंचे कौशल्य पहायला मिळतं. भारताच्या बाजूने फिरणाऱ्या खेळपट्ट्यांवर खेळल्याने विरोधी पक्षात बरंच काही मिळतं. पण मला समजत नाही की त्यांनी अशी खेळपट्टी का तयार केली आहे? असा सवाल स्टुअर्ड ब्रॉडने विचारला आहे.
With the experience & world class talent of Kohli missing, would there have been temptation to bring back Pujara into this India batting line up? Or is his international career over? Feels like he could have brought some consistency and an anchor
— Stuart Broad (@StuartBroad8) February 24, 2024
विराट कोहली सारखा अनुभव आणि जागतिक दर्जाची प्रतिभावान खेळाडू गहाळ असल्याने पुजाराला या भारतीय फलंदाजीत परत आणण्याचा मोह झाला असता का? पण पुजाराची आंतरराष्ट्रीय कारकीर्द संपलीये का? असा प्रश्न उपस्थित करत स्टुअर्ड ब्रॉडने बीसीसीआयच्या वर्मावर बोट ठेवलं आहे. पुजाराला संधी न दिल्याने बीसीसीआय आणि सिलेक्टर्सवर मोठ्या प्रमाणात टीका होत होती. पुजारा असता तर भारताला अँकर टाकायला म्हणजेच एक बाजू राखून खेळता आली असती, असं मत स्टुअर्ड ब्रॉडने मांडलं आहे.