KL Rahul In IND vs ENG 4th Test : हैदराबाद कसोटी सामन्यात झालेल्या पराभवानंतर टीम इंडियाने जोरदार कमबॅक केलं अन् विशाखापट्टणम आणि राजकोट कसोटी सामन्यात इंग्लंडचा धुव्वा उडवला. त्यामुळे आता टीम इंडियाने मालिकेत 2-1 ने आघाडी मिळवली आहे. त्यामुळे आता उर्वरित दोन सामन्यांपैकी एक सामना जिंकल्यानंतर टीम इंडिया मालिका खिशात घालणार आहे. अशातच आता आगामी रांची कसोटी (IND vs ENG 4th Test) सामन्याआधी टीम इंडियाला एक गुड न्यूज मिळाली आहे. टीम इंडियाचा स्टार विकेटकिपर फलंदाज केएल राहुल (KL Rahul) पुनरागमन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना 23 फेब्रुवारीपासून रांची येथे खेळवला जाणार आहे. अशातच आता चौथ्या सामन्यात अनुभवी फलंदाज केएल राहुल खेळण्याची शक्यता आहे. क्वाड्रिसेप्सच्या त्रासामुळे केएल राहुल दुसऱ्या आणि तिसऱ्या कसोटीत खेळू शकला नाही. त्यामुळे आता चौथ्या कसोटीत तो टीम इंडियासोबत मैदानात दिसू शकतो, अशी माहिती समोर आली आहे. बीसीसीआय याबाबत लवकर घोषणा करण्याची शक्यता आहे.
झारखंड क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर होणाऱ्या चौथ्या कसोटीत केएल राहुल आता तर संघातील रजत पाटीदारची सुट्टी होण्याची शक्यता आहे. रजत पाटीदारला तिसऱ्या कसोटीच्या दोन्ही डावात खास कामगिरी करता आली नाही. त्यामुळे रोहित शर्मा चौथ्या कसोटी आपल्या हुकमी एक्क्याला संघात घेऊन रजत पाटीदारला नारळ देणार का? असा सवाल विचारला जात आहे.
केएल राहुल सध्या 90 टक्के तंदुरुस्त असल्याची माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने दिली आहे. त्यामुळे तो चौथ्या कसोटी सामन्यात खेळण्याची शक्यता 90 टक्के आहे. मात्र, रोहितने रजतला आणखी एक संधी दिली तर केएल राहुल 5 वी कसोटी खेळेल, असं देखील पहायला मिळतंय.