IND vs ENG 2nd Test, Sarfaraz Khan : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील दुसरा सामना (India vs England) 2 फेब्रुवारीपासून विशाखापट्टणममध्ये खेळवला जाणार आहे. विशाखापट्टणमचं पीच नेहमी फलंदाजांसाठी पूरक मानलं जातं. मात्र, टेस्ट सामन्यात खेळपट्टी गोलंदाजीसाठी फायदेशीर असेल, अशी शक्यता वर्तविली जात आहे. अशातच आता संघात तीन नव्या खेळाडूंची भरती करण्यात आलीये. ज्यामध्ये सर्फराज खान (Sarfaraz Khan) याला संधी देली गेली. आता सरफराजला टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळणार की नाही? यावर टीम इंडियाचे बॅटिंग कोच विक्रम राठोर (Vikram Rathour) यांनी मोठं वक्तव्य केलंय.
काय म्हणाले विक्रम राठोर?
आमचा खेळाडूंना चांगला क्रिकेट खेळण्याचा संदेश असेल. समोरचा संघ देखील चांगली तयारी करून आला आहे. आम्ही ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिकेत कसोटी सामने जिंकले असल्याने आम्ही त्यांना भारतात जिंकण्याची अपेक्षा करतो, असं बॅटिंग कोच म्हणतात. मैदानात एखाद्या इराद्याने खेळणं आणि आक्रमक क्रिकेट खेळणं यात फरक आहे. त्यांनी इराद्यानं खेळावं अशी माझी इच्छा आहे. जर काही धावा करण्याची संधी असेल तर त्यांनी ती घ्यावी, असं म्हणत विक्रम राठोर यांनी टीम इंडियाच्या फलंदाजांना सुचना दिल्या आहेत.
आमच्या संघात असे तरुण फलंदाज आहेत ज्यांनी जास्त कसोटी क्रिकेट खेळलं नाही. आम्हाला त्यांच्याशी थोडा धीर धरण्याची गरज आहे. शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यर असो... शेवटी मोठ्या धावा करायला लागतील, असंही बॅटिंग कोच म्हणात.
सर्फराज खान की रजत पाटीदार?
कोणाला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी दिली जाईल? सर्फराज खान की रजत पाटीदार? असा सवाल जेव्हा विक्रम राठोर यांना विचारला गेला, तेव्हा त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं. 'हा खूप अवघड निर्णय आहे. दोघं संघासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतात का? तर हो नक्कीच ते चांगले खेळाडू आहेत, त्यांनी डोमॅस्टिक क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. मात्र, कोणाला संधी द्यावी याची निर्णय हा पूर्णपणे कॅप्टन आणि हेड कोच यांच्यावर अवलंबून आहे. परिस्थिती पाहूनच प्लेईंग 11 चा निर्णय घेतला जाईल, असं फलंदाजी प्रशिक्षक राठोड म्हणतात.
Vikram Rathour Said " Our Young batting units have not played much test Cricket. We have to be patient with them.Soon Shubman Gill, Shreyas Iyer and Jaiswal will start getting runs"#INDvsENG #ViratKohli #Rohit #Crickettwitter pic.twitter.com/8zsMLkvmML
— Sujeet Suman (@sujeetsuman1991) January 31, 2024
टीम इंडियाचा संपूर्ण स्कॉड -
रोहित शर्मा (C), शुभमन गिल, यशस्वी जयस्वाल, श्रेयस अय्यर, केएस भरत (WK), ध्रुव जुरेल (WK), रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (VC), आवेश खान, रजत पाटीदार, सरफराज खान, वॉशिंग्टन सुंदर, सौरभ कुमार.