लग्नानंतर 10 दिवसातच संजनानं सुरू केलं काम, फोटो व्हायरल

15 मार्च रोजी संजना गणेशन आणि जसप्रीत बुमराह विवाहबंधनात अडकले.

Updated: Mar 26, 2021, 03:07 PM IST
लग्नानंतर 10 दिवसातच संजनानं सुरू केलं काम, फोटो व्हायरल title=

मुंबई: जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन नुकतेच विवाहबंधनात अडकले आहेत. हातावरची मेहंदी उतरताच 10 दिवसांनंतर पुन्हा एकदा संजना कामाच्या ठिकाणी परतल्याचं पाहायला मिळालं. लग्नामुळे जसप्रीत बुमराहला टीम इंडियातून विश्रांती देण्यात आली होती. मात्र संजयनं पुन्हा आपल्या कामाला सुरुवात केल्याचं पाहायला मिळालं. 

भारत विरुद्ध इंग्लंड दुसऱ्या वन डे सामन्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या स्टार स्पोर्ट्स वाहिनीवर संजना गणेशन कार्यक्रम करताना दिसली. या कार्यक्रमात व्ही व्ही एस लक्ष्मण आणि इरफान पठाणही उपस्थित होते. 

15 मार्च रोजी टीम इंडियाचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन यांचा विवाह मोजक्या लोकांच्या उपस्थित खासगी पद्धतीनं गोव्यामध्ये पार पडला. या सोहळ्याला केवळ 20 लोक उपस्थित होते.

जसप्रीत बुमराह आणि संजना गणेशन दोघांनीही आपल्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ आपल्या चाहत्यांसाठी सोशल मीडियावर शेअर केले होते.