चेन्नई: भारत विरुद्ध इंग्लंड 4 सामन्यांची मालिका खेळवली जात आहे. त्यापैकी पहिला सामना चेन्नई खेळवला जात आहे. इंग्लंडचा कर्णधार अजूनही मैदानात पाय रोवून उभा आहे. जो रूटचा हा 100वा कसोटी सामना आहे. त्यानं सुरुवातीपासूनच आपली फलंदाजी जोरदार केली. दुहेरी शतकी खेळीनंतर मात्र जो रूला तंबुत पाठवण्यात भारतीय संघाच्या गोलंदाजाला अखेर यश आलं आहे.
इंग्लंडचा कर्णधार जो रूटला तंबुत परत पाठवण्यात स्पिनर शाहबाद नादीमला अखेर यश आलं आहे. एकामागे एक अर्धा संघ तंबुत पाठवण्यात अखेर भारतीय संघालाचे गोलंदाज यशस्वी ठरले. भारतीय संघासमोर मात्र 480 हून अधिक धावांचं कडव आव्हान समोर आहे.
कर्णधार जो रूटच्या कारकिर्दीतील पाचवे दुहेरी शतक त्याने चेन्नईतील भारत विरुद्ध इंग्लंड सुरू असलेल्या कसोटी सामन्यात केलं आहे. दुसर्या दिवसापर्यंत इंग्लंडच्या संघाला पहिल्या डावात 480 हून अधिक धावा करण्यात यश आलं आहे.
Big wicket for India!
Joe Root's outstanding innings comes to an end as he falls for 218, lbw off Shahbaz Nadeem.#INDvENG | https://t.co/gnj5x4GOos pic.twitter.com/ta3pJg73Gl
— ICC (@ICC) February 6, 2021
दुसर्या सत्रात इंग्लंडने दुसर्या सत्रात एक विकेट गमावून 99 धावा केल्या. भारताकडून बुमराहला आणखी दोन अश्विन आणि नदीम यांनी प्रत्येकी एक विकेट घेण्यात यश आलं आहे.
प्लेइंग इलेवनमध्ये नव्यानं संधी मिळालेल्या नदीमनं जो रूटची विकेट घेतली आणि त्याला पुन्हा तंबुमध्ये धाडले. त्याच्या यशस्वी कामगिरीचं कौतुक होत आहे. जो रूट 218 रन करून आऊट झाला आहे. आतापर्यंत सामन्यात सर्वाधिक धावा करणारा इंग्लंडचा कर्णधार जो रुटच आहे. आतापर्यंत भारतीय संघाने 6 खेळाडू माघारी धाडले आहेत. मात्र भारतासमोर धावांचं कडवं आव्हान असणार आहे.