India vs Bangladesh ODI Series: पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल, रोहितनंतर 'हा' खेळाडू होणार नवा कॅप्टन?

India vs Bangladesh ODI Series - बांगलादेश दौऱ्यातील शेवटच्या सामन्यात टीम इंडियामध्ये मोठा बदल झाल असून आता एकदिवसीय मालिकेचा कर्णधाराची धूरा या खेळाडूकडे सोपवली जाऊ शकते. 

Updated: Dec 8, 2022, 11:56 AM IST
India vs Bangladesh ODI Series: पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल, रोहितनंतर 'हा' खेळाडू होणार नवा कॅप्टन?    title=

India vs Bangladesh ODI Series : बांगलादेश दौऱ्यावर भारतीय संघासमोर अनेक अडचणी समोर येत आहे. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित शर्माच्या (Rohit sharma) दुखापतीनंतर वनडे मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्याचा कर्णधार आता रोहित शर्मा नसेल हे स्पष्ट झाले आहे. आता तिसऱ्या सामन्यात सामन्यात कर्णधार रोहित शर्मा खेळणार नसल्याने भारताचे कर्णधारपद भारताच्या धाकड फलंदाजाकडे सोपवण्यात येईल असे म्हटले जात आहे.  

मात्र भारतीय संघाची धूरा कोणाला देणार हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे. त्यापूर्वी टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांच्या पत्रकार परिषदेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या पत्रकार परिषदेपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार म्हणून के एल राहुलची (KL Rahul) निवड केली जाऊ शकते.   

बांगलादेशच्या डावातील दुसऱ्याच षटकात स्लीपमध्ये कॅच घेण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माच्या बोटाला दुखापत झाली. त्याने तातडीने मैदान सोडलं अन् स्कॅनसाठी हॉस्पिटल गाठलं. काही वेळानंतर तो बोटाला पट्टी बांधून ड्रेसिंग रूममध्ये परतला. दरम्यान, रोहित शर्मा सामन्यात फलंदाजी करणार नाही असं वाटत असतानाच तो 9 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरला. परंतु तळाच्या फलंदाजांकडून फार साथ न मिळाल्याने रोहितचा संघर्ष अयशस्वी ठरला. . दरम्यान, या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेनंतर टीम इंडियाला बांगलादेशविरुद्ध 2 कसोटी सामने खेळायचे आहेत. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या अंगठ्याला गंभीर दुखापत झाली आहे. संघाचे मुख्य प्रशिक्षक रोहुल द्रविड यांनीही सामन्यानंतर स्पष्ट केले आहे की, तो तिसऱ्या सामन्यात खेळताना दिसणार नाही. टीम इंडिया (team India) तिसऱ्या वनडेत नव्या कर्णधारासह मैदानात उतरणार आहे.

वाचा: क्रिकेट जगताला धक्का देणारी बातमी; टीम इंडियासाठी आजची सकाळ चांगली नाही

दुसऱ्या वनडेत रोहित शर्माच्या अनुपस्थितीत केएल राहुलने (KL Rahul) टीम इंडियाची कमान सांभाळली होती, अशा परिस्थितीत आगामी सामन्यात फक्त केएल राहुलच कर्णधारपद भूषवताना दिसू शकतो. तो संघाचा उपकर्णधारही आहे. 

रोहित कसोटी मालिकेत खेळण्यावर सस्पेन्स

 रोहित शर्माला फ्रॅक्चर नाही पण त्याच्या बोटाला दुखापत जास्त झाली आहे. मॅचनंतरच्या प्रेझेंटेशनमध्ये त्यांनी स्वतः ही गोष्ट सांगितली. पण, त्यानंतर पत्रकार परिषदेला आलेले संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हे रोहितच्या दुखापतीतून लवकर सावरणे किंवा कसोटी मालिकेपूर्वी तंदुरुस्त होण्याबाबत आश्वस्त दिसले नाही.