Ind vs Ban : LIVE सामन्यादरम्यान Virat Kohli रिषभ पंतवर संतापला, पाहा VIDEO

Ind vs Ban, 2nd Test : भारताने दुसऱ्या दिवसाची सुरुवात 19/0 ला केली होती. भारताचे केएल राहुल (10), शुभमन गिल (20) आणि चेतेश्वर पुजारा (24), विराच कोहली (Virat Kohli) (24) धावावर आऊट झाले आहेत.

Updated: Dec 23, 2022, 01:50 PM IST
Ind vs Ban : LIVE सामन्यादरम्यान Virat Kohli रिषभ पंतवर संतापला, पाहा VIDEO title=

Ind vs Ban, 2nd Test : टीम इंडिया आणि बांगलादेश (india vs bangladesh) यांच्यात दुसरा टेस्ट सामना सुरू आहे. या सामन्यात बांगलादेशच्या पहिल्या डावानंतर टीम इंडियाचा (Team India) पहिला डाव सुरू आहे. या पहिल्या डावात भारताचेच खेळाडूल आपआपसात भिडल्याची घटना घडली आहे. या संदर्भातला व्हिडिओही समोर आला आहे. या व्हिडिओची सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे. नेमकं या व्हिडिओत काय घडलंय, हे जाणून घेऊयात. 

टीम इंडिया आणि बांगलादेश (india vs bangladesh) यांच्यातील दुसऱ्या टेस्ट सामन्याचा आज दुसरा दिवस सुरु आहे. या दुसऱ्या दिवशी टीम इंडिया बॅटींग करतेय. या बॅटींगदरम्यान विराट कोहली (Virat Kohli) आणि रिषभ पंत (Rishabh Pant) क्रिझवर असताना एक धक्कादायक घटना घडली. स्ट्राईकवर विराट कोहली असताना त्याला ओव्हरच्या शेवटच्या बॉलवर एक रन घ्यायचा होता. मात्र नॉन स्ट्राईकवर असलेल्या पंतने ते नाकारला. या दरम्यान विराटला डाईव्ह मारून स्वत:ची विकेट वाचवावी लागली होती. या संदर्भातला व्हिडिओ समोर आला आहे.

व्हिडिओत काय? 

दुसऱ्या टेस्ट सामन्याच्या दुसऱ्या दिवशी विराट कोहली (Virat Kohli) ऋषभ पंतवर (Rishabh Pant) भडकला होता. त्याच झालं अस की, कोहलीने मेहदी हसन मिराझने टाकलेल्या बॉलला ऑन-साइडला थोडा धक्का दिला आणि एकेरी धाव काढायला सुरुवात केली. पण पंतने त्याला प्रतिसादच दिला नाही. तो नॉन स्ट्राईकवर उभाच राहिला. त्यामुळे क्रिझ सोडलेल्या विराटला डाईव्ह मारून स्वत:ची विकेट वाचवावी लागली होती. या दरम्यान तो जखमी होण्याची शक्यता होती. यावेळी जमीनीवर कोसळल्यानंतर विराटने पंतला डोळे दाखवले होते. 

बांगलादेशचा पहिला डाव

बागंलादेशकडून मोमिनल हकने सर्वाधिक 84 धावा केल्या. या खेळाडूव्यतिरीक्त एकाही खेळाडूला 30  पेक्षा जास्त धावा करता आल्या नाही. त्यामुळे बांगलादेश पहिल्या डावात 227 धावावर ऑल आऊट झाली होती. टीम इंडियाकडून  रविचंद्रन अश्विन (ravichandran ashwin)  आणि उमेश यादवने (umesh yadav) प्रत्येकी 4 विकेट घेतले. 

दरम्यान भारताने दुसऱ्या दिवसाची सुरुवात 19/0 ला केली होती. भारताचे केएल राहुल (10), शुभमन गिल (20) आणि चेतेश्वर पुजारा (24), विराच कोहली (Virat Kohli) (24) धावावर आऊट झाले आहेत. सध्या क्रिझवर रिषभ पंत आणि श्रेयस अय्यरने जम बसवला आहे. रिषभ पंत शतकाच्या नजीक आहे, तर श्रेयसने अर्धशतक ठोकलंय. भारताच्या  4 विकेट गमावून 225 धावा पुर्ण झाल्या आहेत. आता भारत किती धावांची आघाडी घेतो हे पाहावे लागले.