नवी दिल्ली : टीम इंडीया (Team India) आणि ऑस्ट्रेलियामध्ये (Australia) आज कॅनबराच्या मनुका ओव्हलमध्ये समोरासमोर आलेयत. सलग दोन सामने हरल्यानंतर ऑस्ट्रेलियन खेळाडुंचा आत्मविश्वास वाढलाय तर टीम इंडीया तिसरा सामना जिंकण्याच्या प्रयत्नात असेल. जर ऑस्ट्रेलियाने टीम इंडीयाविरोधात ३-० असा विजय मिळवला तर सलग दुसऱ्या सिरीजमध्ये भारताचा हा पराभव असेल. वर्षाच्या सुरुवातीला न्यूझीलंडने देखील टीम इंडीयाला याच फरकाने हरवले होते.
या अनुषंगाने दोन्ही टीममध्ये काही बदल करण्यात आलेयत. टीम इंडीयामध्ये ४ बदल करण्यात आलेयत. ओपनर मयांक अग्रवालच्या जागी शुभनम गिल, नवदीप सैनीच्या जागी टी नटराजन, युजवेंद्र चहलच्या जागी कुलदीप यादव आणि मोहम्मद शमीच्या जागी शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आलीय.
टीम ऑस्ट्रेलियामध्ये जखमी डेविड वॉर्नर, मिशेल स्टार्कसला आराम देण्यात आलाय. कॅमरन ग्रीनची आज डेब्यू वनडे मॅच आहे. याशिवाय शॉन एब्बट, डार्सी शॉर्ट आणि एस्टन एगर यांना संधी देण्यात आलीय.
विराट कोहलीच्या टीमने ३ मॅचमधील २ सामने गमावलेयत. ऑस्ट्रेलियाची टीम ज्या फॉर्मात आहे ते पाहता टीम इंडीयासमोर मॅच जिंकण आव्हान असणार आहे.
२० वर्षात पहील्यांदाच ऑस्ट्रेलिया टीमकडून क्लीप स्वीपपासून बचावासाठी काय करायला हवं ? असा प्रश्न टीम इंडीयाच्या (Team India) वरच्या फळीतील बॅट्समन श्रेयश अय्यरला विचारण्यात आला. यावेळी, आम्ही मॅच जिंकणार आहोत आणि स्पीप होऊ नये यासाठी प्रयत्न करु असे तो म्हणाला.
आमचे बॉलर्स त्यांच्या बॉलिंगप्रती सकारात्मक आहेत आणि आम्ही सरावादरम्यान हे पाहतोय. काही बॉलर्स रणनितीवर काम करतायत असेही श्रेयश म्हणाला.
कोहली आणि लोकेश राहुल दुसऱ्या मॅचमध्ये चांगल्या लयीत दिसले. राहुल दुसऱ्या पॉवर प्ले दरम्यान स्ट्राइक रोटेड करण्यात अपयशी ठरला हा चिंतेचा विषय आहे. भारतीय बॅट्समन दोन्ही मॅचमध्ये बरा परफॉर्मन्स करतायत. जर बॉलर्सचा परफॉर्मन्स थोडा चांगला असता तर टीम इंडीयाला विजयाची चांगली संधी होती.