राहुल द्रविड नाही तर या मराठमोळ्या प्रशिक्षकाला अर्शदीपने दिले श्रेय

आफ्रिकेसाठी किलर ठरलेल्या अर्शदीपने द्रविड नाहीतर या मराठमोठ्या कोचला दिलं श्रेय

Updated: Sep 30, 2022, 10:07 PM IST
राहुल द्रविड नाही तर या मराठमोळ्या प्रशिक्षकाला अर्शदीपने दिले श्रेय title=

India vs South Africa : टीम इंडियाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंगने (Arshdeep singh) दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या T20 मध्ये टीम इंडियाच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली होती. अर्शदीपच्या घातक स्पेलने आफ्रिकन फलंदाजांना खेळपट्टीवर तग धरू दिला नाही. अर्शदीपने आपल्या या खास कामगिरीचं श्रेय कोच राहुल द्रविडला नाहीतर मराठमोळ्या कोचला दिलं आहे.  (Indian team Bowler Arshdeep singh on bowling coach paras mhambre)

बीसीसीआय टीव्हीला (BCCI TV) दिलेल्या मुलाखतीत बोलताना भारतीय संघाचे कोच पारस म्हांब्रे यांना आपल्या यशाचं श्रेय दिलं आहे.  फिटनेसवर काम करण्याचा प्लॅन मला तुम्हीच सांगितलं होता. त्यानुसार मी बंगळुरूला गेलो त्याच मेहनतीचं चीज झालं. मला ताजंतवानं वाटत आहे, मला ज्या तयारीबाबत तुम्ही विचारलंत त्याचं श्रेय तुम्हालाच जातं असल्याचं अर्शदीप म्हणाला. अर्शदीपची मुलाखत ही स्वत: पारस म्हांब्रे यांनीच घेतली होती. 

मला वाटतं टॉस भारताने जिंकला याचा खूप फायदा झाला. त्यासोबतच (दीपक चहरने) भाईने पहिल्याच षटकात टोन सेट केल्याने मला मदत झाली. मला असं वाटलं की जर तुम्ही सुरूवातीला बॉल वर ठेवलात तर स्विंग होऊ शकतो. मी फक्त गुड लेंथला गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केल्याचही अर्शदीपने सांगितलं.

दरम्यान, अर्शदीपने 4 ओव्हरमध्ये 32 धावा देत 3 विकेट्स घेतल्या होत्या.अर्शदीप सिंगने पहिल्याच षटकात अवघ्या 7 धावा देऊन तिन्ही विकेट घेतल्या. या सामन्यात त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आलं होतं.