ICC World Cup : भारत-अफगाणिस्तान सामन्यात तब्बल 13 रेकॉर्ड्स, पहिल्यांदाच असं घडलं

ICC World Cup : टीम इंडियाने आपल्या मिशन विश्वचषक स्पर्धेची दमरा सुरुवात केली आहे. दिल्लीत अफगाणिस्तानचा 8 विकेटने पराभव करत भारतीय संघाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. भारत-अफगाणिस्तान सामन्यात एक दोन नाही तर तब्बल 13 रेकॉर्ड्स मोडले गेलेत. 

राजीव कासले | Updated: Oct 12, 2023, 02:58 PM IST
ICC World Cup : भारत-अफगाणिस्तान सामन्यात तब्बल 13 रेकॉर्ड्स, पहिल्यांदाच असं घडलं title=

India vs Afghanistan Wordl Cup Recrords : रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने (Team India) विश्वचषक स्पर्धेत दमदार सुरवात केली आहे. आधी ऑस्ट्रेलियाला नंतर अफगाणिस्तानचा पराभव करत टीम इंडियाने सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाने रेकॉर्डब्रेक विजयाची नोंद केली. टॉस जिंकून पहिली फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्तानने (India Vs Afghanistan) भारतासमोर विजयासाठी 273 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण रोहित शर्माच्या (Rohit Sharma) वादळी खेळीपुढे टीम इंडियाने विजयाचं आव्हान अवघ्या 35 व्या षटकातंच पूर्ण केलं. 

रोहित शर्माने आपल्या शतकी खेळीत तब्बल तीन विक्रम रचले. रोहितने 84 चेंडूत 131 धावा केल्या. यात 5 षटकार आणि 16 चौकार लगावले. विराट कोहलीनेही 55 धावांची खेळी केली. या सामन्यात तब्बल 13 ऐतिहासिक विक्रम रचले गेले. क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलंय.

भारताचे तेरा रेकॉर्ड
- भारताने अफगाणिस्तानवरर विजय मिळत नवा विक्रम रचला. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासत भारताने सातव्यांदा 250 किंवा त्यापेक्षा जास्त धावांचं टार्गेट पार केलं. इतर कोणताही संघ 5 पेक्षा जास्तवेळा अशी कामगिरी करु शकलेला नाही. 

- टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पहिला खेळाडू ठरलाय ज्याने विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक शतकांची नोंद केली आहे. याआधी हा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिन तेंडुलकरने सर्वाधिक सहा शतकं केली होती. रोहित शर्माने सात शतकं करत सचिनचा विक्रम मागे टाकलाय.

सर्वात जास्त सिक्स
शतकाआधी रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकारांचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. याआधी अव्वल स्थानावर 553 षटकारांसह ख्रिस गेल होता. रोहित शर्माने हा विक्रम मोडीत काढत 556 षटकार लगावलेत. 

विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
2278 - सचिन तेंडुलकर
1115 - विराट कोहली
1009* - रोहित शर्मा
1006 - सौरव गांगुली
860 - राहुल द्रविड

एकदिवसीय आणि टी20 विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावांचा विक्रम
2311 रन  -   विराट कोहली
2278 रन  -   सचिन तेंडुलकर
2193 रन  -   कुमार संगकारा
2151 रन  -   ख्रिस गेल
2116 रन  -   महेला जयवर्धने

विश्वचषक स्पर्धेत वेगवान हजार धावा
19 - डेविड वॉर्नर
19 - रोहित शर्मा
20 - सचिन तेंदुलकर
20 - एबी डिविलियर्स
21 - सर विवियन रिचर्ड्स
21 - सौरव गांगुली

विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक शतकं
7 - रोहित शर्मा
6 - सचिन तेंडुलकर
5 - रिकी पोंटिंग
5 - कुमार संगकारा

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं
49 - सचिन तेंडुलकर
47 - विराट कोहली
31 - रोहित शर्मा
30 - रिकी पोंटिंग
28 - सनथ जयसूर्या

सलामीला येऊन सर्वधिक शतकं
45 - सचिन तेंडुलकर
29 - रोहित शर्मा
28 - सनथ जयसूर्या
27 - हाशिम अमला
25 - ख्रिस गेल

विश्वचषकात कमी चेंडूंत शतकाचा रेकॉक्ड
49 - एडेन मार्करम (साउथ अफ्रीका) vs श्रीलंका, दिल्ली, 2023
50 - केविन ओ'ब्रायन (आयरलँड) vs इंग्लंड, बंगळुरु, 2011
51 - ग्लेन मॅक्सवेल (ऑस्ट्रेलिया) vs श्रीलंका, सिडनी, 2015
52 - एबी डिविलियर्स (साउथ अफ्रीका) vs वेस्टइंडीज, सिडनी, 2015
57 - ओएन मोर्गन (इंग्लंड) vs अफगाणिस्तान, मॅनचेस्टर, 2019
63 - रोहित शर्मा vs अफगाणिस्तान, दिल्ली, 2023

विश्वचषक स्पर्धेत धावांचा पाठलाग करताना शतक
3 - रोहित शर्मा
2 - सर गॉर्डन ग्रीनिज
2 - रमीज राजा
2 - स्टीफन फ्लेमिंग

विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक धावांच्या आव्हानाचा पाठलाग
288 vs झिम्बाब्वे, ऑकलँड, 2015
275 vs श्रीलंका, मुंबई वानखेड़े, 2011 फायनल
274 vs पाकिस्तान, सेंच्युरियन, 2003
273 vs अफगाणिस्तान, दिल्ली, 2023
265 vs श्रीलंका, हेडिंग्ले, 2019

विश्वचषक स्पर्धेत हायेस्ट रनरेट्सचा रेकॉर्ड
7.8 - (273/2) - भारत vs अफगानिस्तान, दिल्ली, 2023
7.78 - (283/1) - न्यूजीलँड vs इंग्लंड, अहमदाबाद, 2023
7.75 - (322/3) - बांगलादेश vs वेस्टइंडीज, टॉन्टन, 2019
7.13 - (345/4) - पाकिस्तान vs श्रीलंका, हैदराबाद, 2023
7.05 - (260/2) - भारत vs आयरलँड, हेमिल्टन, 2015