अबब! 2500 धावा, 85 विकेट..विश्वचषक 2023 स्पर्धेत टीम इंडियाचा 'टॉप-5' फॉर्म्युला यशस्वी

Team India World cup 2023: आयसीसी विश्वचषक 2023 स्पर्धेत टीम इंडियाने आतपर्यंत खेळलेले सर्व दहा सामने जिंकत इतिहास रचलाय. आता 19 नोव्हेंबरला टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्ध अंतिम सामन्यात खेळण्यासाठी उतरणार आहे. या स्पर्धेत टॉप-5 फॉर्म्युला यशस्वी झालाय.

राजीव कासले | Updated: Nov 17, 2023, 03:09 PM IST
अबब! 2500 धावा, 85 विकेट..विश्वचषक 2023 स्पर्धेत टीम इंडियाचा 'टॉप-5' फॉर्म्युला यशस्वी title=

ICC World cup 2023 by Indian : विश्वचषक 2023 स्पर्धेत टीम इंडियाच्या मिशन वर्ल्ड कपला (Mission World Cup) 8 ऑक्टोबर 2023 रोजी सुरुवात झाली. पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आणि यानंतर टीम इंडियाच्या विजयाची मालिकाच सुरु झाली. स्पर्धेत आतार्यंत सलग 10 विजय मिळवणाऱ्या टीम इंडियाची नजर आता विश्वचषकावर आहे. 19 नोव्हेंबरला अहमदाबाच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर टीम इंडियाचा (Team India) मुकाबला पाचवेळ वर्ल्ड कप विजेत्या ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. 

टीम इंडियाचा टॉप-5 फॉर्म्युला
या संपूर्ण स्पर्धेत टीम इंडियाचा टॉप-5 फॉर्म्युला (Top 5 Formula) जबरदस्त यशस्वी ठरतोय. टीम इंडियाच्या टॉपच्या पाच फलंदाज आणि पाच गोलंदाजांनी या स्पर्धेत आतापर्यंत तब्बल 2523 धावा केल्या आहेत. तर 85 विकेट घेतल्या आहेत. विशेष म्हणजे या संपूर्ण विश्वचषकात टीम इंडिया कोण्या एका खेळाडूवर अवलंबून नाहीए. संघातील प्रत्येक खेळाडू मॅचविनिंग कामगिरी करतोय. वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहलीच्या नावावर सर्वाधिक धावा आहेत. सचिन तेंडुलकरने 2003 च्या विश्वचषकात 673 धावांचा विक्रम केला होता. विराटने 700 हून अधिक धावा करत हा विक्रम मोडला. 

तर मोहम्मद शमीने यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेण्याचा विक्रम केलाय. शणीने आतापर्यंत 23 विकेट घेतल्या आहेत. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक 54 विकेट घेणारा तो भारतीय गोलंदाज ठरला आहे. 

टीम इंडियाच्या टॉप फलंदाजांची कामगिरी राहिली तर विराट कोहली, रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, केएल राहुल आणि शुभमन गिल या फलंदाजांनी आतापर्यंत 2,523 धावा केल्या आहेत. तर जसप्रीत बुमराह, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद स‍िराज  आणि मोहम्मद सिराज या टॉप 5 गोलंदाजांनी 85 विकेट घेतल्या आहेत. 

विराट कोहलीची विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरी

एकूण सामने - 10 
एकूण धावा - 711
अॅव्हरेज - 101.57
स्ट्राइक रेट - 90.68        
शतकं - 3 
अर्धशतकं - 5     

रोहित शर्माची विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरी

एकूण सामने - 10 
एकूण धावा - 550
अॅव्हरेज -  55.00  
स्ट्राइक रेट - 124.15          
शतकं - 1 
अर्धशतकं - 3     

श्रेयस अय्यरची विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरी

एकूण सामने - 10 
एकूण धावा - 526 
अॅव्हरेज -  75.14  
स्ट्राइक रेट - 113.11        
शतकं - 2 
अर्धशतकं - 3 

केएल राहुलची  विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरी

एकूण सामने - 10 
एकूण धावा - 386 
अॅव्हरेज -  77.20  
स्ट्राइक रेट -  98.72     
शतकं - 1 
अर्धशतकं - 1 

शुभमन गिलची विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरी

एकूण सामने - 8 
एकूण धावा - 350
अॅव्हरेज -  50.00   
स्ट्राइक रेट -  108.02
शतकं - 0
अर्धशतकं - 4

या स्पर्धेत टीम इंडियाच्या गोलंदाजांनीही धमाकेदार कामगिरी केली आहे. 

मोहम्मद शमीची विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरी

एकूण सामने - 6 
एकूण  विकेट - 23 
सर्वोत्तम कामगिरी -  7/57
इकोनॉमी - 5.01

जसप्रीत बुमराहची विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरी

एकूण सामने - 10
एकूण  विकेट - 18 
सर्वोत्तम कामगिरी -  4/39
इकोनॉमी - 3.98 

रवींद्र जडेजाची विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरी

एकूण सामने - 10
एकूण  विकेट - 16 
सर्वोत्तम कामगिरी -  5/33
इकोनॉमी - 4.25

कुलदीप यादवची विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरी

एकूण सामने - 10
एकूण  विकेट - 15 
सर्वोत्तम कामगिरी -  2/7
इकोनॉमी - 4.32   

मोहम्मद स‍िराजची विश्वचषक 2023 स्पर्धेतील कामगिरी

एकूण सामने - 10
एकूण  विकेट - 13 
सर्वोत्तम कामगिरी -  3/16
इकोनॉमी - 5.61    

टीम इंडियाचा विश्वचषकातला प्रवास
पहिला सामना (8 ऑक्टोबर - चेन्नई ) - ऑस्ट्रेलियाचा 6 विकेटने पराभव
दुसरा सामना (11 ऑक्टोबर - दिल्ली) अफगाणिस्तानचा 8 विकेटने पराभव 
तिसरा सामना (14 ऑक्टोबर - अहमदाबाद) पाकिस्तानचा 7 विकेटने पराभव
चौथा सामना (19 ऑक्टोबर - पुणे) बांगलादेशचा 7 विकेटने पराभव
पाचवा सामना (22 ऑक्टोबर - धरमशाला) न्यूझीलंडचा 4 विकेटने पराभव
सहावा सामना (29 ऑक्टोबर - लखनऊ) इंग्लंडचा 100 धावांनी पराभव
सातवा सामना (2 नोव्हेंबर - मुंबई) श्रीलंकेचा 302 धावांनी पराभव
आठवा सामना ( 5 नोव्हेंबर - कोलकाता) दक्षिण आफ्रिकेचा 243 धावांनी पराभव
नववा सामना ( 12 नोव्हेंबर - बंगळुरु) नेदरलँडचा 160 धावांनी पराभव
दहावा सामना (15 नोव्हेंबर, सेमीफायनल - मुंबई) न्यूझीलंडचा 70 धावांनी पराभव