VIDEO : ....म्हणून व्हायरल होतोय हरमनप्रीत कौरचा 'हा' व्हिडिओ

हरमनप्रीतचा हा व्हिडिओ......

Updated: Nov 14, 2018, 07:48 AM IST
VIDEO : ....म्हणून व्हायरल होतोय हरमनप्रीत कौरचा 'हा' व्हिडिओ  title=

मुंबई : क्रिकेट हा अनेकांसाठी सर्वाधिक मनोरंजनात्मक खेळ ठरतो. इथे खेळाडूंचा अफलातून खेळ पाहायला मिळतोच. पण, त्यासोबतच क्रिकेटच्या मैदानात अनेकदा असे प्रसंग घडतात जे पाहता खरंच ते खूप काही शिकवून जातात. अनेकांसाठी आदर्श ठरतात. असाच एक प्रसंग महिलांच्या टी२० विश्चचषकादरम्यान पाहायला मिळाला. 

भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्याच्या सुरुवातीलाच मैदानात असं काही घडलं जे पाहून अनेकांच्या मनात हरमनप्रीत कौर हिच्याविषयी असणारा आदर आणि अभिमान आपोआपच वाढला. 

भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. 

भारत- पाकिस्तान या संघामधील सामना सुरु होण्यापूर्वी दोन्ही संघ राष्ट्रगीतासाठी मैदानावर आले होते. त्यावेळी राष्ट्रगीत सुरु असताना हरमनप्रीतसोबत उभ्या असलेल्या चिमुकलीला चक्कर आली. 

तिने लगेचच या मुलीला आपल्या कुशीत घेतलं आणि राष्ट्रगीत संपल्यानंतर तिला मैदानावर उपस्थित अधिकाऱ्याकडे सोपवलं. हा व्हिडिओ आणि हरमनप्रीतने उचलेललं हे पाऊल पाहचा तिचं सोशल मीडियापासून क्रीडावर्तुळापर्यंत सर्वत्र चांगलच कौतुक होत आहे. 

दरम्यान, हरमप्रीतच्या नेतृत्त्वाखाली मैदानात आलेल्या भारतीय महिला क्रिकेट संघाने पाकिस्तानला ७ गडी राखून पराभूत केलं. त्याशिवाय तिने दाखवलेल्या माणुसकीमुळे खऱ्या अर्थाने ही कुडी सगळ्यांची मनं जिंकून गेली असं म्हणायला हरकत नाही.