Shubman Gill No.1 ODI Batsman: आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारतीय क्रिकेट संघ पॉईंटटेबलमध्ये (World Cup PointTable) नंबर वन आहे. आतापर्यंत खेळलेल्या सर्व आठ सामने जिंकत टीम इंडियाने (Team India) दणक्यात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता आयसीसीने टीम इंडियाला आणखी एक खुशखबर दिली आहे. आयसीसीने एकदिवसीय क्रमवारी (ICC ODI Rankings) जाहीर केली आहे. यात पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमची बादशाहत संपवत भारताचा युवा स्टार फलंदाज शुभमन गिल (Shubman Gill) नंबर वन बनला आहे. तर मोहम्मद सिराज (Mohamamd Siraj) नंबर वन गोलंदाज ठरला आहे.
आयसीसीची एकदिवसीय क्रमवारी
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत गेल्या 951 दिवसांपासून पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम अव्वल स्थानावर कायम होता. पण भारताचा युवा स्टार सलामीवीर शुभमन गिलने बाबर आझमची (Babar Azam) ही बादशाहत संपवली आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या नव्या क्रमवारीत शुभमन गिल (Shubman Gill) नंबर वन फलंदाज बनला आहे. शुभमन गिलच्या खात्यात 830 पॉईंट आहे. तर बाबर आझमच्या खात्यात 824 पॉईंट जमा आहेत. एकदिवसीय क्रिकेटमध्ये 49 शतकांचा विक्रम करणारा विराट कोहली या यादीत 770 पॉईंटसह चोथ्या क्रमांकावर आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा 739 पॉईंटसह सहाव्या क्रमांकावर आहे.
गोलंदाजीत सिराज अव्वल
फलंदाजीत शुभमन गिल नंबर वन फलंदाज बनला असतानाच भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजने (Mohammad Siraj) मोठी भरारी घेतली आहे. आयसीसी एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत मोहम्मद सिराज नंबर वन बनला आहे. सिराजच्या खात्यात 709 पॉईंट जमा आहेत. विश्वचषचकात तर चार सामन्यात सोळा विकेट घेणारा मोहम्मद शमीनेही (Mohammad Shami) टीप-10 मध्ये एन्ट्री केली आहे. शमीच्या खात्यात 635 पॉईंट जमा झाले आहेत. शमीने चार सामन्यात दोनवेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. शमीशिवाय भारताचा चायनामन गोलंदाज कुलदीप यादवन (Kuldeep Yadav) थेट चौथ्या स्थानावर झेप घेतली आहे. तर अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज राशिद खान आणि न्यूझूलंडचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टला एकेका स्थानाचा फायदा झालाय.
A big day for India's #CWC23 stars with two new No.1 players crowned in the latest @MRFWorldwide ICC Men's ODI Player Rankings
Details https://t.co/nRyTqAP48u
— ICC (@ICC) November 8, 2023
नंबर वन भारतीय फलंदाज
आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनेही पहिल्या स्थानावर मजल मारली होती. याशिवाय विराट कोहली आणि एमएम धोनीनेही ही कमाल केली आहे. विशेष म्हणजे एकदिवसीय क्रिकेट क्रमवारीत भारत नंबर वन आहे.