WTC Final | विजयी संघ होणार मालामाल, ICCकडून बक्षिसाची रक्कम जाहीर, किती पैसे मिळणार?

या अंतिम सामन्याचं आयोजन 18-22 जूनदरम्यान साऊथम्पटनमध्ये (Southampton) करण्यात आले आहे. 

Updated: Jun 14, 2021, 08:27 PM IST
WTC Final | विजयी संघ होणार मालामाल, ICCकडून बक्षिसाची रक्कम जाहीर, किती पैसे मिळणार? title=

मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना (ICC World Test Championship Final) टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) यांच्यात खेळवण्यात येणार आहे. या अंतिम सामन्याचं आयोजन 18-22 जूनदरम्यान साऊथम्पटनमध्ये (Southampton) करण्यात आले आहे. दोन्ही संघांमध्ये अजिंक्यपदासाठी कडवी झुंज पाहायला मिळणार आहे. (icc ceo announced that the winner of the World Test Championship 2021 will receive US $1.6 million as prize money)

अजिंक्यपद मिळवणाऱ्या संघाला आयसीसीकडून विशेष गदा देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच अंतिम सामना जिंकणाऱ्या संघाला तसेच उपविजेत्या संघाला बक्षिस म्हणून किती रक्कम मिळणार याबाबतची माहिती समोर आली आहे. इएसपीएन क्रिकइंफोने आयसीसीच्या एका अधिकाऱ्याच्या माहितीनुसार याबाबतचे वृत्त दिले आहे.  

 
आयसीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्यॉफ एलरडाईस यांनी क्रिकइंफोला दिलेल्या माहितीनुसार, "विजयी संघाला 1.6 मिलियन अमेरिकी डॉलर म्हणजेच 11 कोटी 71 लाख इतकी रक्कम मिळणार आहे. तर उपविजेता संघाला 8 लाख डॉलर म्हणजेच 5 कोटी 85 लाख रुपये मिळणार आहे".

उर्वरित संघानाही बक्षिस

आयसीसी केवळ विजेत्या आणि उपविजेत्या संघाव्यतिरिक्त इतर संघांनाही बक्षिस म्हणून काही रक्कम देणार आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाला  4.50 लाख डॉलर म्हणजेच 3 कोटी 29 लाख रुपये मिळणार आहेत. तर चौथ्या क्रमांकावरील इंग्लंडला  3.50 लाख डॉलर म्हणजेच  2 कोटी 56 लाख रुपये बक्षिस म्हणून मिळणार आहेत. पाचव्या क्रमांकावरील टीमला 1 कोटी 46 लाख रुपये बक्षिस म्हणून मिळणार आहेत. तर उर्वरित 4 संघांना प्रत्येकी  73 लाख रुपये देण्यात येणार आहेत.  हा अंतिम सामन टाय किंवा अनिर्णित राहिला, तर विजयी रक्कम ही दोन्ही संघांना समसमान देण्यात येईल.  

संबंधित बातम्या :

WTC Final | अंतिम सामन्यासाठीची खेळपट्टी कोणासाठी फायदेशीर ठरणार? जाणून घ्या...