Shakib Al Hasan: वर्ल्डकपमध्ये सध्या एकाहून एक रोमांचक सामने होताना दिसतायत. सोमवारी श्रीलंका विरूद्ध बांगलादेश यांच्यात झालेल्या सामन्यात मोठा राडा पहायला मिळाला. दिल्लीच्या अरूण जेटली मैदानावर हा सामना रंगला होता आणि यामध्ये अँजेलो मॅथ्यूज तसंच शाकिब अल हसन यांच्यात वादाची ठिणगी पडली.
या सामन्यात टॉस जिंकल्यानंतर बांगलादेशाच्या टीमने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी श्रीलंकेच्या टीमने पहिल्यांदा फलंदाजी करत 50 ओव्हर्समध्ये 279 रन्सची खेळी केली. तर बांगलादेशाच्या टीमने 7 विकेट्स गमावून श्रीलंकेचा पराभव केला. सामना संपल्यानंतर या विवादावर शाकिब अल हसनने ( Shakib Al Hasan ) मौन सोडलंय.
यंदाच्या वर्ल्डकपमधून बांगलादेशाची टीम भलेही बाहेर पडली असेल. मात्र सर्व चाहत्यांना हा सामना लक्षात राहणार आहे. बांगलादेशी कर्णधार शाकिब अल हसनच्या या कृत्यामुळे अनेक चाहते नाराज झाले आहेत.
पोस्ट प्रेझेंटेशन सेरेमनीमध्ये बोलताना शाकिब अल हसन म्हणाला की, आम्ही खेळ खेळत होतो. मुळात माझी टीम जिंकावी यासाठी मी सर्व काही करण्यासाठी तयार आहे. मी चूक केलं की बरोबर केलं याची चर्चा आता यापुढे होणारच आहे. परंतु मला माहितीये की, मी जे केलं ते नियमांना धरून होतं.
टॉस जिंकल्यावर आम्ही प्रथम गोलंदाजी करताना आम्हाला कोणताही संकोच वाटला नाही. या ठिकाणी दव पडतं हे सरावात पाहिलं होतं. माझी आणि शांतोची पार्टनरशिप अप्रतिम होती. आम्ही सामना थोडा लवकर संपवायला हवा होता. थोड्या कमी विकेट पडल्या होत्या. युवा खेळाडू हे आमच्या टीमचं भविष्य आहेत हे आम्हाला माहीत आहे. आम्ही हृदयसारख्या खेळाडूंना पाठीशी घालत आहोत, असंही शाकिब अल हसन याने सांगितलं.
बांगलादेशसाठी आतापर्यंत ही एक वेगळी स्पर्धा राहिली आहे. कर्णधार शकिब अल हसनच्या नेतृत्वाखालील टीमची कामगिरी अत्यंत लाजिरवाणी ठरलीये. बांगलादेशाच्या टीमला 6 सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. यावेळा शाकिबनेही फारशी चांगली कामगिरी केलेली नाही. शाकिबने 7 सामन्यात खराब फलंदाजी करताना 104 रन्स केले आहेत. तर गोलंदाजीमध्येही तो केवळ 7 विकेट्स घेऊ शकला आहे.