मुंबईचा पराभव करत हैदराबाद प्ले ऑफमध्ये, कोलकाता IPL मधून बाहेर

हैदराबादचा मुंबईवर दणदणीत विजय

Updated: Nov 3, 2020, 11:24 PM IST
मुंबईचा पराभव करत हैदराबाद प्ले ऑफमध्ये, कोलकाता IPL मधून बाहेर title=

दुबई : इंडियन प्रीमियर लीगच्या 13 व्या मोसमातील 56 व्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील सामन्यात हैदराबादचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजी करणाऱ्या मुंबईने 20 ओव्हरमध्ये 8 विकेट गमवत 149 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादकडून कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि ऋद्धिमान साहा यांच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर 17 ओव्हरमध्ये 10 विकेट राखून मुंबईचा पराभव केला.  या विजयासह हैदराबाद प्लेऑफमध्ये पोहोचणारा चौथा संघ ठरला. कोलकात्याचा संघ प्लेऑफमधून बाहेर झाला आहे.

कर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि ऋद्धिमान साहा यांनी जोरदार सुरुवात केली. दोन्ही फलंदाजांनी कोणतीही विकेट न गमावता सामना जिंकला. वॉर्नरने 35 बॉलमध्ये 6 फोर आणि 1 सिक्ससह अर्धशतक पूर्ण केले. साहाने 34 बॉलमध्ये अर्धशतक पूर्ण केले. साहाने 7 फोर मारले.

साहा आणि वॉर्नरने संघाला विजय मिळवून दिला आणि हैदराबादच्या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश केला. कर्णधार वॉर्नरने 58 बॉलमध्ये 85 धावा तर साहाने 45 चेंडूत 58 धावांची नाबाद खेळी केली.

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात माघारी परतला. रोहित शर्माला संदीप शर्माने आऊट केले. सलामीवीर फलंदाज क्विंटन डिकॉकने संघासाठी 25 धावांचे योगदान दिले आणि संदीप शर्माच्या बॉलवर आऊट झाला. सूर्यकुमार यादवने 36 धावा केल्या. ईशान किशनने 33 धावा केल्या.