Lionel Messi: सुजलेल्या पायाने लंगडत मैदानात आला आणि...; जिंकल्यानंतर मेस्सीची पहिली रिएक्शन व्हायरल!

Lionel Messi: कोलंबिया विरूद्ध अर्जेंटीना या सामन्यात निर्धारित वेळेपर्यंत सामना 0-0 असा बरोबरीत होता. दुसऱ्या अतिरिक्त वेळेत लॉटारो मार्टिनेझने अर्जेंटिनासाठी गोल केला. या सामन्यात अर्जेंटिनाचा कर्णधार आणि अनुभवी खेळाडू लिओनेल मेस्सी उत्तरार्धात मैदानाबाहेर गेला. 

Updated: Jul 16, 2024, 04:59 PM IST
Lionel Messi: सुजलेल्या पायाने लंगडत मैदानात आला आणि...; जिंकल्यानंतर मेस्सीची पहिली रिएक्शन व्हायरल! title=

Lionel Messi: अर्जेंटीनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सीच्या शिरपेचात अजून एक तुरा रोवला गेलाय. यावेळी अर्जेंटिनाने 16 व्यांदा कोपा अमेरिकेचा खिताब जिंकला. यावेळी लिओनेल मेस्सीच्या नेतृत्वाखाली अर्जेंटींनाने सलग दुसऱ्यांदा या ट्रॉफीवर नाव कोरलं आहे. सोमवारी झालेल्या अर्जेंटींना विरूद्ध कोलंबिया या सामन्यात अर्जेंटींनाने 1-0 असा विजय मिळवला. दरम्यान या सामन्यात एक मोठी घटना घडली ती म्हणजे, लिओनेल मेस्सीच्या पायाला झालेली दुखापत.

कोलंबिया विरूद्ध अर्जेंटीना या सामन्यात निर्धारित वेळेपर्यंत सामना 0-0 असा बरोबरीत होता. दुसऱ्या अतिरिक्त वेळेत लॉटारो मार्टिनेझने अर्जेंटिनासाठी गोल केला. या सामन्यात अर्जेंटिनाचा कर्णधार आणि अनुभवी खेळाडू लिओनेल मेस्सी उत्तरार्धात मैदानाबाहेर गेला. लियोनेल मेस्सीच्या पायाला 66 व्या मिनिटाला गंभीर दुखापत झाली. यावेळी मेस्सीचा पाय प्रचंड सुजला होता. अशा परिस्थितीत देखील दुखापतीनंतर टीमच्या विजयानंतर मेस्सीने मैदानात येऊन सेलिब्रेशन केले. यावेळी जिंकल्यानंतर मेस्सीच्या पहिल्या रिएक्सनचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

मेस्सीला कशी झाली दुखापत?

कोपा अमेरिकेच्या फायनल सामन्यामध्ये लिओनेल मेस्सीच्या पायाला गंभीर दुखापत झाली. सामन्यातील 66 व्या मिनिटाला मेस्सीच्या पायाला ( अँकलला ) दुखापत झाली होती. यावेळी मैदानावर धावत असताना मेस्सी पडला आणि त्याच्या पायाला ही दुखापत झाल्याचं समोर आलं. मेस्सीची ही दुखापत इतकी गंभीर होती की, त्याला मैदान सोडावं लागलं. 

बेंचवर बसून ओक्साबोक्शी रडू लागला मेस्सी

कोपा अमेरिका फायनलच्या दुसऱ्या हाफमध्ये लिओन मेस्सी खेळत असताना तो जखमी झाला. मेस्सी बाहेर गेल्यावर निकोलस गोन्झालेज याला मैदानात पाठवण्यात आलं. यावेळी बेंचवर बसलेल्या लिओनेल मेस्सीला अश्रू आवरता आले नाहीत. मेस्सी देखील डगआऊटमध्ये बसल्यावर ढसाढसा रडू लागला. सामना अंतिम टप्प्यात असताना आपण काहीही करू शकत नाही, याची जाणीव मेस्सीला सुजलेल्या पायाकडे पाहून झाली. चाहते देखील मेस्सीच्या व्हिडीओने भावूक झाले आहेत. 

मार्टिनेजला मारली मिठी

​दरम्यान 90 मिनिटांमध्ये सामना 0-0 अशा स्थितीत होता. मात्र एक्ट्रा वेळेत 112 व्या मिनिटाला अर्जेंटीनाच्या लॉटारो मार्टिनेझने गोल केला. यावेळी जेव्हा कॅमेरा मेस्सीकडे नेण्यात आला तेव्हा तो फार खूश दिसून आला. त्याने तातडीने मार्टिनेझनला मिठी मारली या एक्ट्रा टाईममधील गोलने अर्जेंटीनाचा विजय जवळपास निश्चित झाला होता. 

सेलिब्रेशनमध्ये मागे नव्हता मेस्सी

उजव्या पायाला झालेल्या दुखापतीमुळे मेस्सीला धावणं तर सोडा चालणंही शक्य नव्हतं. मात्र तरीही तो सेलिब्रेशनपासून दूर राहिला नाही. ज्यावेळी अर्जेंटीना जिंकला तेव्हा एका पायाने लंगडत लंगडत मेस्सी पुढे आला आणि सेलिब्रेशन करू लागला मेस्सीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.