Shikhar Dhawan : 'शिखर हिंमत ठेव, पोटच्या लेकाला...', धवनसाठी अक्षय कुमारची भावूक पोस्ट, म्हणतो 'एक बापच फक्त...'

Shikhar Dhawan Painful Post : शिखर तू हिंमत ठेव, आम्ही लाखो लोक तुझी आणि तुझ्या मुलाची भेट व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहोत, असं अक्षय कुमार (Akshay kumar) म्हणाला आहे.

सौरभ तळेकर | Updated: Dec 28, 2023, 07:55 PM IST
Shikhar Dhawan : 'शिखर हिंमत ठेव, पोटच्या लेकाला...', धवनसाठी अक्षय कुमारची भावूक पोस्ट, म्हणतो 'एक बापच फक्त...' title=
Akshay kumar On Shikhar Dhawan

Akshay kumar On Shikhar Dhawan : टीम इंडियाचा स्टार सलामीवीर फलंदाज शिखर धवन (Shikhar Dhawan) सध्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. एकीकडे टीम इंडियामध्ये संधी मिळत नाही अन् दुसरीकडे पत्नी आयशा मुखर्जीच्या (Ayesha Mukherjee) घटस्फोटामुळे शिखर अडचणीत सापडला आहे. शिखर धवनने आपल्या मुलाच्या वाढदिवसानिमित्त धवनने एक भावनिक पोस्ट (Shikhar Dhawan Emotional) केली होती. त्याच्या या पोस्टनंतर अनेकांच्या डोळ्यात पाणी आल्याचं पहायला मिळालं. काळजाला भिडणारी पोस्ट पाहून सोशल मीडियावर तुफान चर्चा झाली होती. त्यानंतर आता बॉलिवूड स्टार अक्षय कुमार (Akshay kumar) याने इन्टाग्रामवर शिखरसाठी खास पोस्ट शेअर केलीये. 

काय म्हणाला Akshay kumar?

शिखरची ही पोस्ट पाहून माझं मन खरोखरच हादरलंय. एक वडील म्हणून मला जाणीव आहे की, तुम्हाला तुझ्या मुलाला भेटता न येणं ही किती त्रासदायक गोष्ट आहे. शिखर तू हिंमत ठेव, आम्ही लाखो लोक तुझी आणि तुझ्या मुलाची भेट व्हावी, यासाठी प्रार्थना करत आहोत, असं अक्षय कुमार (Akshay kumar On Shikhar Dhawan) म्हणाला आहे.

काय होती शिखरची पोस्ट ?

मी तुझी वैयक्तिक भेट घेऊन आता वर्ष झालं आहे. त्यात मागील तीन महिन्यांपासून मला प्रत्येक ठिकाणावर ब्लॉक करण्यात आलं आहे. त्यामुळे मी हा फोटो पोस्ट करत तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहे माझ्या बाळा... मी तुझ्याशी थेट संपर्क साधू शकत नसलो तरीही, मी तुमच्याशी मनाने जोडला जातो. मला तुझा खूप अभिमान आहे आणि मला माहित आहे की तू फार चांगल्या रितीने वाढत आहेस. बाबा तुझी नेहमीच आठवण काढतो, आणि तुझ्यावर फार प्रेम करतो. तो नेहमीच सकारात्मक असतो. देवाच्या कृपने आपली भेट होईल त्या दिवसाची मी चेहऱ्यावर हास्य ठेवून वाट पाहत आहे. खोडकर हो पण विध्वंसक नाही, देणारा हो, नम्र, दयाळू, सहनशील आणि बलवान हो... तुला पाहिलं नसतानाही मी तुला रोज मेसेज लिहितो. तुझी तब्येत, नियमित आयुष्य याबद्दल विचारत असतो. तसंच मी काय करत आहे. आयुष्यात नवं काय आहे हे शेअर करत असतो, अशी पोस्ट शिखरने लिहिली होती.

आणखी वाचा - PAK vs AUS : कॅमेरामॅनमुळे जोडप्यावर आली तोंड लपवण्याची वेळ; LIVE सामन्यात असं काही करत होते की... पाहा Video

दरम्यान, धवनचा मुलगा जोरावरचा मंगळवारी (26 डिसेंबर) वाढदिवस झाला होता. दरवर्षी लेकासाठी काहीना काही खास करणारा बाप यावेळी एकटा होता. काळीज चिरणारी पोस्ट पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी आलंय. त्याचबरोबर सोशल मीडियावर तुफान प्रतिक्रिया उमटताना दिसत आहेत.