WTC Final 2023: हार्दिक पांड्या सोडणार टेस्ट क्रिकेट? क्रिडाविश्वात एकच खळबळ!

Lance Klusener On hardik pandya: कसोटी क्रिकेटमध्ये (Test Cricket) इतके बदल झालेले नाहीत पण काळही बदलला आहे, हे मी समजू शकतो. कदाचित हार्दिक पांड्याने कसोटी क्रिकेट सोडलंय, असं म्हणता येईल, असंही लान्स क्लुजनर (Lance Klusener) याने म्हटलं आहे.

Updated: Jun 3, 2023, 09:39 PM IST
WTC Final 2023: हार्दिक पांड्या सोडणार टेस्ट क्रिकेट? क्रिडाविश्वात एकच खळबळ! title=
hardik pandya, Lance Klusener

WTC Final 2023: दोन सिरीजमध्ये दोन फायनल, अशी कामगिरी आयपीएलमध्ये (IPL 2023) करणारा संघ ठरलाय तो गुजरात टायटन्सला. कॅप्टन हार्दिक पांड्या (Hardik Pandya) याच्या नेतृत्वाखाली गुजरातने दमदार कामगिरी केली आणि फायनलमध्ये धडक मारली. मात्र, अंतिम सामन्यात त्यांना चेन्नईकडून पराभवाला सामोरं जावं लागलं. मात्र, गुजरातला मजबुती देणारा हाच हार्दिक पांड्या गेल्या 4 वर्षापासून कसोटी संघातून (Hardik Pandya Test Team) बाहेर आहे. अशातच आता हार्दिक पांड्या कसोटी क्रिकेट सोडणार का? असा सवाल आता उपस्थित होताना दिसत आहे. त्याला कारण ठरतंय एका दिग्गज खेळाडूचं महत्त्वाचं स्टेटमेंट.

दक्षिण आफ्रिकेचा महान अष्टपैलू खेळाडू लान्स क्लुजनर (Lance Klusener) याने हार्दिक पांड्याचं वर्णन जगातील सर्वोत्तम वेगवान गोलंदाज अष्टपैलू खेळाडूंपैकी एक, असं केलं आहे. वर्कलोड मॅनेजमेंटसाठी तो कसोटी क्रिकेट सोडू शकतो, असं वक्तव्य देखील क्लुसनरने (Lance Klusener On Hardik Pandya) केलंय. त्यामुळे आता क्रिडाविश्वात खळबळ उडाल्याचं पहायला मिळतंय. सध्या सुरू असलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यासाठीच्या यादीत देखील त्याला संधी देण्यात आली नाही.

हार्दिक पांड्या याने कसोटी क्रिकेट सोडलं?

पांड्या सप्टेंबर 2018 मध्ये शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर आता तो फक्त वनडे आणि टी-ट्वेंटी खेळतो. त्यावर लान्स क्लुजनरने भाष्य केलंय. हार्दिक पांड्या उत्तम खेळाडू आहे. तो फीट असला तर त्याच्या 135 किंवा 140 च्या स्पीडचा सामना करणं अवघड जातं. कसोटी क्रिकेटमध्ये इतके बदल झालेले नाहीत पण काळही बदलला आहे, हे मी समजू शकतो. कदाचित हार्दिक पांड्याने कसोटी क्रिकेट सोडलंय, असं म्हणता येईल, असंही लान्स क्लुजनर (Lance Klusener) याने म्हटलं आहे.

आणखी वाचा - क्रिकेटच्या पंढरीत मोडला डॉन ब्रॅडमॅन यांचा रेकॉर्ड, 'या' पठ्ठ्याने रचला इतिहास!

दरम्यान, भारत डब्ल्यूटीसी फायनलमध्ये (WTC Final 2023) वेगवान गोलंदाजी किंवा फिरकीवर भारताची पकड असेल. स्पिनर्स ही पारंपारिकपणे भारताची ताकद आहे. कोणत्याही खेळपट्टीवर ते चांगली कामगिरी करतात, असं म्हणत त्याने भारतीय गोलंजदाजांचं कौतूक केलंय. येत्या 7 जून ते 11 जून यादरम्यान भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचा अखेरचा सामना खेळवण्यात येणार आहे. तर 12 जून हा रिझर्व डे देखील ठेवण्यात आला आहे.