हार्दिक पांड्याशी जोडले गेलेय आणखी एका बॉलीवूड अभिनेत्रीचे नाव

क्रिकेट आणि बॉलीवूडचे नाते तसे जुनेच आहे. झहीर खान-सागरिका घाटगे आणि विराट कोहली-अनुष्का शर्मा यांच्या लग्नानंतर आता भारताचा ऑलराउंडर क्रिकेटर हार्दिक पांड्याचे नावही वारंवार बॉलीवूड अभिनेत्रींशी जोडले जातेय.

Updated: Jun 11, 2018, 05:36 PM IST
हार्दिक पांड्याशी जोडले गेलेय आणखी एका बॉलीवूड अभिनेत्रीचे नाव title=

मुंबई : क्रिकेट आणि बॉलीवूडचे नाते तसे जुनेच आहे. झहीर खान-सागरिका घाटगे आणि विराट कोहली-अनुष्का शर्मा यांच्या लग्नानंतर आता भारताचा ऑलराउंडर क्रिकेटर हार्दिक पांड्याचे नावही वारंवार बॉलीवूड अभिनेत्रींशी जोडले जातेय. गेल्या वर्षी हार्दिकचा भाऊ कृणालच्या लग्नादरम्यान हार्दिकचे नाव अभिनेत्री एली अवरामशी जोडले गेले होते. काही दिवसांपूर्वी त्याचे उर्वशी रौतेलाशी अफेयर असल्याचीही चर्चा होती. मात्र आता अशी बातमी आहे की हार्दिक आणखी एका बॉलीवूड अभिनेत्रीला डेट करतोय. मात्र या अभिनेत्रीच्या इन्स्टाग्राम पोस्टवरुन या बातमीबाबतचे सत्य समोर आलेय.

कृणालच्या लग्नातील प्रत्येक सोहळ्यात एली अवराम सहभागी झाली होती. तेव्हापासून तिचे नाव हार्दिक पांड्याशी जोडले गेले होते. दरम्यान, या लग्नानंतर हार्दिक आणि एली  यांना अनेकदा एकत्र पाहिले गेले होते. एली अवराम शूटदरम्यान तसेच एअऱपोर्टवरही एकत्र पाहिले गेले होते. दोघांचे फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. 

यानंतर हार्दिकचे उर्वशी रौतेलाशी अफेयर असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र खुद्द उर्वशीने या चर्चांना पूणविराम दिला. एली अवराम आणि रौतेलानंतर आता पुन्हा एकदा हार्दिक पांड्याचे नाव बॉलीवूड अभिनेत्रीशी जोडले गेलेय. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिक सध्या ईशा गुप्ताला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. आताही अशाही बातम्या आहेत की हार्दिक आणि एलीचा ब्रेकअप झालाय कारण एलीला नात्यात कमिटमेंट हवी होती आणि हार्दिक या नात्याबाबत कॅज्युअल होता. यामुळेच यांचा ब्रेकअप झाल्याचे बोलले जातेय. या ब्रेकअपनंतर हार्दिकची इशा गुप्तासोबत जवळीक वाढू लागलीये.

हार्दिक आणि इशाची भेट एका पार्टीत झाली होती. यानंतर या दोघांनी चॅटिंग सुरु केली आणि भेटीगाठी वाढल्या. दरम्यान या नात्याबाबत इशा गुप्ता वा हार्दिक पांड्याने याबाबत कोणतेही  विधान केलेले नाहीये. मात्र इशाने आपल्या इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केलेत. यावरुन इशा आणि हार्दिकच्या नात्याचे सत्य समोर आलेय. या पोस्टवरुन हार्दिक आणि इशा यांचे अफेयर ही केवळ अफवा आहे. इशाने नुकतेच एक फोटोशूट इन्स्टाग्रामवर शेअर केलेय. यात तिने असं लिहिलंय की, हे फोटो माझा प्रियकर राहुलने काढलेत. जर इशा खुलेआम आपल्या प्रियकराचे नाव सांगतेय याचा अर्थ इशा आणि हार्दिक यांच्या अफेयरच्या चर्चा निव्वळ अफवा आहेत.

 

Many faces for my Rahul..

A post shared by Esha Gupta (@egupta) on