IPL 2022 : हार्दिक पांड्याच्या अर्धशतकानं गेली तरुणाची नोकरी?

अरेरे बिचारा! पांड्याने 50 करताच तरुणाला मोठा धक्का, नोकरी सोडण्याची वेळ 

Updated: Apr 13, 2022, 02:27 PM IST
IPL 2022 : हार्दिक पांड्याच्या अर्धशतकानं गेली तरुणाची नोकरी? title=

मुंबई : हैदराबाद विरुद्ध गुजरातचा दारूण पराभव झाला. गुजरातचा हा पहिला पराभव आहे. हार्दिक पांड्याला पहिल्या पराभवाचा सामना करावा लागला. हार जीतपेक्षा या सामन्यातील काही खास क्षणांची चर्चा सोशल मीडियावर होत आहे. एका तरुणाची नोकरी हार्दिक पांड्याच्या अर्धशतकानं जाणार का याची धाकधूक आहे.

गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याचा एक फॅन सध्या ट्वीटरवर खूप ट्रेन्डिंगमध्ये आहे. स्टेडियममध्ये मॅच पाहायला आलेल्या या चाहत्याने हार्दिकने 50 रन काढले तर मी माझी नोकरी सोडेन असं म्हटलं होतं. त्याचं हे पोस्टर सोशल मीडियावर खूप व्हायरल झालं होतं. 

हार्दिक पांड्याने हैदराबाद विरुद्ध अर्धशतक केलं. आता सगळ्यांना असा प्रश्न आहे की हा तरुण नोकरीचा राजीनामा देणार का? 11 एप्रिल रोजी सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध गुजरात सामन्यात ही घटना घडली. 

हार्दिक पांड्याने अर्धशतक केल्यानंतर हार्दिक पांड्याबाबतचा बॅनर दाखवणाऱ्या या तरुणाला सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे. हा पोस्टर दाखवणारा तरुण आता कुठे गेला. तो आपली नोकरी सोडणार का? त्याची नोकरी गेली का? असे अनेक प्रश्न आहेत. सध्यातरी हे प्रश्न अनुत्तरीत आहेत.