IND vs NZ T20 : टीम इंडियाचा 'हा' खेळाडू जिंकवून देणार मालिका, कॅप्टन पांड्याने काढला हुकमी एक्का!

IND vs NZ, Hardik Pandya: दुसऱ्या सामन्यासाठी आणि मालिकेत लाज राखण्यासाठी कॅप्टन हार्दिक पांड्याने ( IND vs NZ 2nd T20I) मोठा निर्णय घेतला आहे.

Updated: Jan 29, 2023, 07:22 PM IST
IND vs NZ T20 : टीम इंडियाचा 'हा' खेळाडू जिंकवून देणार मालिका, कॅप्टन पांड्याने काढला हुकमी एक्का!  title=
IND vs NZ, Hardik Pandya

India vs New Zealand, 2nd T20I: भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यात सुरू असलेल्या टी-ट्वेंटी मालिकेत टीम इंडियाची सुरूवाच निराशाजनक झाली आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताला 21 धावांनी पराभूत केलं. त्याचबरोबर न्यूझीलंडने या मालिकेत 1-0 ने विजयी आघाडी घेतली. अशातच आता लखनऊ (Lucknow) येथे खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या सामन्यात टीम इंडिया मालिकेत कमबॅक करेल, अशी अपेक्षा केली जात आहे. अशातच आता दुसऱ्या सामन्यासाठी आणि मालिकेत लाज राखण्यासाठी कॅप्टन हार्दिक पांड्याने (Hardik Pandya) मोठा निर्णय घेतला आहे. (Hardik Pandya dropped Umran Malik from the team and replaced Yuzvendra Chahal in IND vs NZ 2nd T20I sports news)

दुसऱ्या टी-ट्वेंटी सामन्यासाठी हार्दिक पांड्याने प्लेइंग इलेव्हनमध्ये (Playing XI) महत्त्वाचा बदल केलाय. पांड्याने संघातून उमरान मलिकला (Umran Malik) ड्रॉप करून यझुवेंद्र चहलला (Yuzvendra Chahal) संघात स्थान दिलं आहे. त्यामुळे आता पांड्याने हुकमी एक्का बाहेर काढल्याची चर्चा होताना दिसते.

पृथ्वी शॉला संधी नाही - 

दुसऱ्या टी-20 सामन्यात युवा पृथ्वी शॉला प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी देण्यात आली नाही. त्यामुळे आता चर्चेला उधाण आलंय. भारत विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand) दोन्ही सं  एकूण 23 वेळा आंतरराष्ट्रीय टी - 20 सामने खेळलेत. यापैकी 10  सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला आहे. तसेच, न्यूझीलंड संघानंही 10 सामने जिंकले आहेत, तर 3 सामने ड्रॉ राहिलेत.

टीम इंडियाची प्लेइंग इलेव्हन (Playing XI) :

शुभमन गिल, इशान किशन (WK), राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (C), दीपक हुडा, वॉशिंग्टन सुंदर, शिवम मावी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग